Corona मुळे प्रायव्हेट पार्टची लांबी झाली कमी? यावर तज्ज्ञांनी दिलं चिंताजनक उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 02:45 PM2022-01-13T14:45:27+5:302022-01-13T14:46:39+5:30

Penis Shrank Due To Corona : अमेरिकन व्यक्तीने दावा केला की, कोविडमुळे त्याचा प्रायव्हेट पार्ट दीड इंच छोटा झाला आहे. या व्यक्तीने असंही सांगितलं की, जेव्हा त्याने याबाबत डॉक्टरांना सांगितलं तेव्हा ते म्हणाले की, यावर काहीच उपाय नाही.

Omicron long covid penis shrank damage blood vessels erectile dysfunction in men | Corona मुळे प्रायव्हेट पार्टची लांबी झाली कमी? यावर तज्ज्ञांनी दिलं चिंताजनक उत्तर...

Corona मुळे प्रायव्हेट पार्टची लांबी झाली कमी? यावर तज्ज्ञांनी दिलं चिंताजनक उत्तर...

googlenewsNext

जगभरात कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या (Omicron) केसेस वेगाने वाढत आहेत. तेच बरेच लोक लॉंग कोविडचे शिकारही होत आहेत. लॉंग कोविडमुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच एका अमेरिकन व्यक्तीने दावा केला आहे की, कोरोनामुळे त्याच्या प्रायव्हेट पार्टची लांबी (Penis Shrank Due To Corona) कमी झाली.

यूरोलॉजिस्ट म्हणाले की, हा एक रिअल फिनोमिना आहे की, कोविडमुळे रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचल्याने प्रायव्हेट पार्टची साइज छोटी होऊ शकते. यूनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या नेतृत्वात ३४०० लोकांवर एक रिसर्च करण्यात आला. यातून असं आढळून आलं की, ज्या २०० लोकांमध्ये लॉंग कोविडची लक्षणं होती, त्यातील अनेक लोकांना पेनिसची लांबी घटल्याचीही एक समस्या होती.

अमेरिकन व्यक्तीने दावा केला की, कोविडमुळे त्याचा प्रायव्हेट पार्ट दीड इंच छोटा झाला आहे. या व्यक्तीने असंही सांगितलं की, जेव्हा त्याने याबाबत डॉक्टरांना सांगितलं तेव्हा ते म्हणाले की, यावर काहीच उपाय नाही.

पॉडकास्ट 'हाउ टू डू इट'मध्ये कॉल करत या व्यक्तीने सांगितलं की, 'गेल्यावर्षी जुलैमध्ये मला कोविड झाला होता आणि मी गंभीर आजारी होतो. जेव्हा मी हॉस्पिटलमधून बाहेर आला तेव्हा मला इरेक्टाइल डिस्फंक्शन होतं. ही समस्या उपचारानंतर हळूहळू ठीक झाली. पण पेनिसची लांबी दीड इंच छोटी झाली. मला विश्वास आहे की, हे ब्लड वेसेल्समुळे झालं असेल. यामुळे माझ्या लैंगिक जीवनावर परिणाम झाला आहे'.

तज्ज्ञ काय म्हणाले?

इरेक्टाइल डिस्फंक्शनला सामान्य भाषेत 'नपुंसकता'असंही म्हणतात. अमेरिकेतील Urologist Ashley Winter MD यांनी सांगितलं की, कोविडनंतर प्रायव्हेट पार्ट आकुंचन इरेक्टाइल डिस्फंक्शनचा एक प्रभाव आहे. ते म्हणाले की, हे खरं आहे की, इरेक्टाइल डिस्फंक्शन झाल्याने पेनिस छोटा होतो'.

डॉक्टर विंटर म्हणाले की, जेव्हा कोविड पेनिसमधील रक्तवाहिन्यांच्या एंडोथेलियल कोशिकांमध्ये प्रवेश करतो, तेव्हा याने योग्यप्रकारे रक्तप्रवाह होत नाही. त्यांनी एका रिसर्चचा हवाला दिला, ज्यात यूरोलॉजिस्टना दोन पुरूषांच्या पेनिसमध्ये कोरोना व्हायरसचे कण आढळले. जे संक्रमणातून पूर्णपणे बरे झाल्यावरही इरेक्टाइल डिस्फंक्शनने ग्रस्त होते.

रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतोय कोरोना

रिसर्चनुसार, कोरोना रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवत आहे. सोबतच तो शरीरातील अवयवही खराब करत आहे. ज्या पुरूषांमध्ये इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या नव्हती, ते कोरोना संक्रमित झाल्यावर या गंभीर समस्येने ग्रस्त होत आहेत.

यूनिव्हर्सिटी कॉलेज लंडनने लॉंग कोविड लक्षणांवर एक रिसर्च केला. ज्यात ५६ देशातील रूग्णांमध्ये २०३ लक्षणे आढळून आली. लॅंसेटच्या ईक्लिनिकल मेडिसिनमध्ये प्रकाशित रिझल्टनुसार, जवळपास ५ टक्के पुरूषांना पेनिसचा आकार कमी होणे या समस्येचा सामना करावा लागला. जवळपास १५ टक्के पुरूषांना लैंगिक समस्येची तक्रार होती. कोरोना इरेक्टाइल डिस्फंक्शनचा धोका २० टक्क्यांनी वाढवतो.
 

Web Title: Omicron long covid penis shrank damage blood vessels erectile dysfunction in men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.