ओमायक्रॉनबाबत WHO ने दिला गंभीर इशारा; लसीचा प्रभाव कमी करतो अन् वेगाने पसरतो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 02:09 PM2021-12-13T14:09:52+5:302021-12-13T14:12:38+5:30

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूच्या या व्हेरिएंटबाबत जगभरातील नागरिकांना पुन्हा इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओने म्हटलंय की, ओमायक्रॉन व्हेरिएंट लसीची प्रभाव कमी करण्यात सक्षम आहे आणि ती वेगाने पसरत आहे. 

Omicron Reduces Vaccine Efficacy, Spreads Faster, Says WHO | ओमायक्रॉनबाबत WHO ने दिला गंभीर इशारा; लसीचा प्रभाव कमी करतो अन् वेगाने पसरतो

ओमायक्रॉनबाबत WHO ने दिला गंभीर इशारा; लसीचा प्रभाव कमी करतो अन् वेगाने पसरतो

Next

भारतात दिवसेंदिवस ओमायक्रॉन प्रकाराची प्रकरणं वाढत आहेत. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूच्या या व्हेरिएंटबाबत जगभरातील नागरिकांना पुन्हा इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओने म्हटलंय की, ओमायक्रॉन व्हेरिएंट लसीची प्रभाव कमी करण्यात सक्षम आहे आणि ती वेगाने पसरत आहे. 

कोरोना व्हायरसच्या बाबतीत लवकरच ओमायक्रॉन डेल्टा व्हायरसलाही मागे टाकेल अशी शक्यता डब्ल्यूएचओने व्यक्त केली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने रविवारी सांगितलं की, प्राथमिक माहितीनुसार, ओमिक्रॉन डेल्टा स्ट्रेनपेक्षा जास्त संसर्गजन्य आहे. त्याचप्रमाणे संसर्ग झाल्यानंतर शरीरात लसीची परिणामकारकता कमी होते, जरी हा व्हेरिएंट फारच कमी लक्षणं दाखवत असेल. 

यूएन एजन्सीच्या तज्ज्ञांच्या मते, अशी शक्यता आहे की, ओमायक्रॉन लवकरच डेल्टा व्हेरियंटला मागे टाकेल. डेल्टा प्रकार प्रथम भारतात ओळखला गेला आणि जगातील सर्वाधिक कोरोना संसर्ग आणि मृत्यूसाठी ते जबाबदार असल्याचं मानलं जातंय. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचे पहिलं प्रकरण नोंदवलं गेलं. त्यानंतर ते वेगाने इतर देशांमध्ये पसरलं. युरोपियन युनियन, अमेरिका, भारतासह सर्व मोठ्या देशांनी एकतर आफ्रिकन देशांतून येणाऱ्या फ्लाइटवर बंदी घातली आहे किंवा पूर्ण तपासणीनंतरच या देशांतील प्रवाशांना येण्याची परवानगी दिली जातेय.

युनायटेड नेशन्स हेल्थ एजन्सी म्हणते की, ओमायक्रॉनचा प्रसार फार कमी वेळात ६३ देशांमध्ये झाला आहे. पुरेशा डेटाची कमतरता लक्षात घेता, WHO ने म्हटलं की, ओमायक्रॉन व्हेरिएंट रोग प्रतिकारशक्तीसाठी डेल्टाइतके धोकादायक असू शकत नाही, परंतु या दोघांच्या अभिसरणामुळे नवीन धोका निर्माण होऊ शक

Web Title: Omicron Reduces Vaccine Efficacy, Spreads Faster, Says WHO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.