Omicron लोकांमध्ये इतक्या वेगाने का पसरत आहे? WHO ने सांगितली तीन कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 03:07 PM2022-01-08T15:07:55+5:302022-01-08T15:08:34+5:30

Omicron : ओमायक्रॉनचा पसरण्याचा वेग वैज्ञानिकांना हैराण करत आहे. यादरम्यान WHO च्या टेक्निकल प्रमुख मारिया वॅन केर्खोव यांनी ओमायक्रॉन वेगाने पसरण्याची तीन कारणं सांगितली आहेत.

Omicron spread more faster due to various factors says WHO | Omicron लोकांमध्ये इतक्या वेगाने का पसरत आहे? WHO ने सांगितली तीन कारणं

Omicron लोकांमध्ये इतक्या वेगाने का पसरत आहे? WHO ने सांगितली तीन कारणं

googlenewsNext

कोरोना व्हायरसचं (Corona Virus) नवं व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron) जगभरात वेगाने वाढत आहे. दिल्ली, मुंबईसारख्या मोठ्या शहरमध्ये रोज नव्या केसेस समोर येत आहेत. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन फार हलका व्हेरिएंट सांगितला जात आहे, पण याचा पसरण्याचा वेग वैज्ञानिकांना हैराण करत आहे. यादरम्यान WHO च्या टेक्निकल प्रमुख मारिया वॅन केर्खोव यांनी ओमायक्रॉन वेगाने पसरण्याची तीन कारणं सांगितली आहेत.

केर्खोव म्हणाल्या की, लोकांनी व्हायरसबाबत धोका कमी करणे आणि याचं ट्रान्समिशन नियंत्रित करण्याबाबत विचार करण्याची गरज आहे. गेल्या आठवड्यात कोरोनाच्या रेकॉर्ड केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. ज्या आधीच्या आठवड्याच्या तुलनेत ७१ टक्के जास्त आहेत. वॅन केर्खोव म्हणाल्या की नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंट अनेक कारणांनी  लोकांमध्ये पसरत आहे. 

'पहिलं कारण म्हणजे, नव्या व्हेरिएंटच्या म्यूटेशन व्हायरसला मानवाच्या कोशिकांमध्ये सहजपणे जुळण्यास मदत करतात. दुसरं म्हणजे, नव्या व्हेरिएंटमध्ये इम्यून सिस्टीममधून सुखरूप बाहेर पडण्याची क्षमता आहे. त्यामुळे लोकांमध्ये रिइन्फेक्शनचा धोका वाढला आहे. म्हणजे आधी संक्रमणाचे शिकार झालेले लोक किंवा वॅक्सीनेट झालेल्या लोकांचंही यापासून वाचणं अवघड आहे'.

तिसरं कारण कारण केर्खोव म्हणाल्या की, 'ओमायक्रॉन आम्हाला अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये व्हायरसला रेप्लीकेट होताना दिसत आहे. जी डेल्टा किंवा आधीच्या कोणत्याही व्हेरिएंटपेक्षा पूर्णपणे वेगळी बाब आहे. कोरोनाचे आधीचे सगळे स्ट्रेन फुप्फुसांमध्ये लोवर रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये रेप्लीकेट होत होते, ज्यामुळे यांचा पुढे जाण्याचा वेग जरा कमी होत होता'.

या सर्वच कारणांशिवाय व्हायरस लोकांच्या जास्त भेटीगाठीमुळे वेगाने पसरत आहे. सुरूवातीपासून एक्सपर्ट लोकांना चांगल्या व्हेंटीलेशन असलेल्या ठिकाणी राहण्यास सांगत आहेत. बंद ठिकाणांवर लोक एकत्र राहिल्याने संक्रमणाचा धोका वाढतो. WHO ने सांगितलं की, गेल्या आठवड्यात जगभरात कोरोनाचे रेकॉर्ड ९५ लाख केसेस नोंदवण्यात आल्या आहेत.
 

 

Web Title: Omicron spread more faster due to various factors says WHO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.