Omicron Symptoms : ओमायक्रॉनचं सर्वात असामान्य लक्षण आलं समोर, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 01:20 PM2022-01-03T13:20:55+5:302022-01-03T13:21:58+5:30

Omicrom Symptoms : हेल्थ एक्सपर्ट्स लोकांना कोणत्याही प्रकारच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला देत आहेत. डॉक्टरांनी ओमायक्रॉनच्या एका असामान्य लक्षणाबाबत सांगितलंय, ज्यावर सामान्यपणे लोक लक्ष देत नाहीत.

Omicron Symptoms: Indian's should watch out for loss of appetite other than cold fever cough | Omicron Symptoms : ओमायक्रॉनचं सर्वात असामान्य लक्षण आलं समोर, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Omicron Symptoms : ओमायक्रॉनचं सर्वात असामान्य लक्षण आलं समोर, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Next

Omicrom Symptoms : कोरोना व्हायरसचा (Corona Virus) नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने (Omicron Variant) जगभरात थैमान घातलं आहे. वैज्ञानिक सतत या व्हेरिएंटबाबत नवनवीन माहिती मिळवत आहेत. WHO ने आधीच इशारा दिला आहे की, ओमायक्रॉन कोरोना व्हायरसच्या इतर कोणत्याही व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक वेगाने पसरतो. एक्सपर्ट म्हणाले की, लक्षणांवर लक्ष न दिल्याने केसेस आणखी वाढण्याची शक्यता आहे. हेच कारण आहे की, हेल्थ एक्सपर्ट्स लोकांना कोणत्याही प्रकारच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला देत आहेत. डॉक्टरांनी ओमायक्रॉनच्या एका असामान्य लक्षणाबाबत सांगितलंय, ज्यावर सामान्यपणे लोक लक्ष देत नाहीत.

काय आहे लक्षण?

कोरोनाच्या सर्वात सामान्य लक्षणांमध्ये टेस्ट जाणे, गंध जाणे, ताप येणे, घशात खवखव आणि अंगदुखी ही आहेत. ओमायक्रॉनच्या प्रत्येक रूग्णांमध्ये ही लक्षणं आढळत नाहीयेत. आतापर्यंतच्या डेटाच्या आधारावर वैज्ञानिकांनी सांगितलं की, कोरोनाच्या केवळ ५० टक्के रूग्णांना ताप, कफ आणि टेस्ट-गंध कमी जाणवतात. ओमायक्रॉनच्या जास्तीत जास्त रूग्णांमध्ये एक खास लक्षण नक्की आढळून येत आहे आणि ते आहे भूक न लागणं. जर तुम्हाला इतर काही लक्षणांसोबत भूकही लागत नसेल तर तुम्ही डॉक्टर किंवा एखाद्या एक्सपर्टला नक्की दाखवा. त्यानंतर कोविडची टेस्ट करा.

भारतात ओमायक्रॉनच्या केसेस

भारतात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या १७०० केसेस समोर आल्या आहेत. यादरम्यान भारतात ओमायक्रॉनच्या संक्रामकतेचा दर, इम्यूनपासून वाचण्याची क्षमता आणि गंभीरतेवर स्पष्ट पुरावे समोर आलेले नाहीत. INSACOG ने आपल्या बुलेटिनमध्ये सांगितलं की, अजूनही डेल्टा व्हेरिएंट चिंतेचा विषय बनला आहे. अशातच ओमायक्रॉन वेगाने पसरत आहे.
INSACOG ने सांगितलं की, 'दक्षिण आफ्रिके केसेस वाढणं सुरूच आहे. मात्र, हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे. ब्रिटनमध्ये जीनोम सीक्वेंसिंगमध्ये आढळून आलं की, S-gene टार्गेट फेल्यूरमुळे ओमायक्रॉन केसेसमध्ये वाढ बघण्यात आली आहे. यामुळे डेल्टालाही वेगाने पसरण्याची संधी मिळेल'. 

ओमायक्रॉनवर वॅक्सीनचा प्रभाव

केंद्र सरकारने सांगितलं की, याचे काहीच पुरावे नाही की, सध्याच्या वक्सीन ओमायक्रॉन व्हेरिएंटवर प्रभावी ठरणार नाहीत. वॅक्सीनमुळे अॅंटीबॉडी आणि सेलुलर इम्यूनिटी वाढते ज्याने चांगली सुरक्षा मिळते. त्यामुळे याचे पूर्ण पुरावे आहेत की, वॅक्सीन गंभीर आजारापासून वाचवते. त्यामुळे सर्वांना आवर्जून वॅक्सीनचे दोन डोज घ्यावेत.
 

Web Title: Omicron Symptoms: Indian's should watch out for loss of appetite other than cold fever cough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.