१० सिगारेट इतकाच १ बॉटल वाइनमुळे कॅन्सरचा धोका!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 10:55 AM2019-03-30T10:55:55+5:302019-03-30T10:56:13+5:30

तुम्हाला माहीत आहे का की, वाइनच्या एका बॉटलमधून कॅन्सर तितकाच धोका असतो, जितका १० सिगारेटीमधून असतो?

One bottle of wine increases the risk of cancer to the same extent as smoking of 10 cigarettes says a study | १० सिगारेट इतकाच १ बॉटल वाइनमुळे कॅन्सरचा धोका!

१० सिगारेट इतकाच १ बॉटल वाइनमुळे कॅन्सरचा धोका!

(Image Credit : The Independent)

तुम्हाला माहीत आहे का की, वाइनच्या एका बॉटलमधून कॅन्सर तितकाच धोका असतो, जितका १० सिगारेटीमधून असतो? नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून हे सांगण्यात आलं आहे. रिसर्चमधून सांगण्यात आलं आहे की, एक बॉटल वाइन प्यायल्याने कॅन्सरचा तितकाच धोका असतो जितका १० सिगारेट ओढल्यावर असतो. 

अभ्यासकांनी मद्यसेवन आणि स्मोकिंग यांच्यातून कॅन्सरचा वाढणारा धोका याची तुलना केली. आणि यातून त्यांना महिलांबाबतची आश्चर्यकारक आकडेवारी आढळली. तेच जेव्हा त्यांनी पुरूषांचं याबाबत निरीक्षण केलं तेव्हा समोर आलं की, आठवड्यातून वाइनची एक बॉटल प्यायल्याने कॅन्सरचा धोका तितकाच असतो, जेवढा ५ सिगारेटमुळे असतो.

अल्कोहोलमुळे कॅन्सरचा धोका सर्वात जास्त महिलांमध्ये आढळला. कारण याचा संबंध ब्रेस्ट कॅन्सरशी सुद्धा आहे. यूनिव्हर्सिटी हॉस्पिटल साउथम्पटन, बंगोर यूनिव्हर्सिटी आणि साउथम्पटन यूनिव्हर्सिटीनुसार, आठवड्यात एक बॉटल दारू म्हणचे १० यूनिटचा अर्थ आहे की, स्मोकिंग न करणाऱ्या १ टक्का पुरूषांना अल्कोहोलचे इतके पेग प्यायल्याने लाइफटाइम कॅन्सरचा धोका असतो. तर हा धोका महिलांमध्ये १.४ टक्के अधिक असतो. 

डॉ. थेरेसा हेदिस यांनी सांगितले की, 'हे तर सर्वांनाच माहीत आहे की, जास्त मद्यसेवन केल्याने कॅन्सर होतो, पण लोक याबाबत फार गंभीर दिसत नाहीत. ते केवळ स्मोकिंगलाच कॅन्सरशी जोडून बघतात. आम्हाला आशा आहे की, सिगारेटसोबतच मद्याच्या आणि कॅन्सरच्या कनेक्शनची तुलना करून आपण लोकांना प्रभावपूर्वक संदेश देऊ शकतो. जेणेकरून ते लाइफस्टाइलमध्ये आवश्यक बदल करतील'. 

मात्र, ब्रिटीश बिअर अ‍ॅन्ड पब असोसिएशनचे ब्रिगिड सिमन्डस यांनी या रिसर्चला निरर्थक असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, यात लोकांना जागरूक करण्यासाठी काहीच खास नाही'. तेच काही एक्सपर्ट्स म्हणाले की, दारू पिण्याऐवजी स्मोकिंगमुळे कॅन्सरचा धोका अधिक असतो. 

Web Title: One bottle of wine increases the risk of cancer to the same extent as smoking of 10 cigarettes says a study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.