Video : पोटावरील चरबी कमी करण्यासाठी महिलांसाठी १ मिनिटांची खास एक्सरसाइज!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 09:58 AM2019-09-04T09:58:34+5:302019-09-04T10:00:55+5:30
वजन कमी करण्यादरम्यान शरीराच्या वेगवेगळ्या अंगांवरील चरबी सहजपणे बर्न होते, पण पोटावरील चरबी दूर व्हायला बराच वेळ लागतो.
(Image Credit : medicalnewstoday.com)
बेली फॅट म्हणजेच पोटावरील चरबी कमी करणं सर्वात कठीण मानलं जातं. वजन कमी करण्यादरम्यान शरीराच्या वेगवेगळ्या अंगांवरील चरबी सहजपणे बर्न होते, पण पोटावरील चरबी दूर व्हायला बराच वेळ लागतो. बेली फॅटची समस्या अलिकडे सर्वच वयोगटातील लोकांना होते. मात्र, महिलांमध्ये ही समस्या अधिक दिसते. फिटनेस एक्सपर्ट पोटावरील चरबी कमी करण्यासाठी वेगवेगळ्या एक्सरसाइज सांगतात. त्यातील सर्वात प्रभावी एक्सरसाइज प्लॅंक एक्सरसाइज मानली जाते. कारण प्लॅंक एक्सरसाइजने फॅट बर्न करण्यास मदत मिळते.
प्लॅंक बेली फॅट कसं बर्न करते
(Image Credit : YouTube)
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी प्लॅंक सर्वात फायदेशीर एक्सरसाइज यासाठीही मानली जाते, कारण याने पोटावरील चरबीच्या आजूबाजूच्या मांसपेशींमध्ये सक्रियता येते. जर शरीर पूर्णपणे फिट ठेवायचं असेल तर ही प्लॅंक एक्सरसाइज नियमितपणे करायला हवी. ही एक्सरसाइज कशी करावी, याचा एक व्हिडीओ आम्ही खाली देत आहोत. हा व्हिडीओ नवी सुरूवात करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल.
बेली फॅट बर्न करायची असेल किंवा शरीर फिट ठेवायचं असेल तर प्लॅंक एक्सरसाइजमध्ये संतुलन चांगलं असलं पाहिजे. फिटनेस एक्सपर्टनुसार, प्लॅंक पोजिशनमध्ये जेवढा जास्त वेळ तुम्ही थांबू शकाल, तेवढा जास्त फायदा होतो.
(Image Credit : popsugar.com)
सुरूवातीला प्लॅंक करणारे लोक स्वत:ला ६० सेकंद एक्सरसाइज पोजिशनमध्ये ठेवू शकतात. जर तुम्ही या पोजिशनमध्ये एका मिनिट स्वत:ला व्यवस्थित ठेवू शकत असाल तर नंतर ही एक्सरसाइज ३ ते ४ वेळा करावी.
कोणतीही एक्सरसाइज असो त्याचा प्रभाव ती एक्सरसाइज योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेवर केल्याने होतो. प्लॅंक करताना नेहमी पोजिशनकडे लक्ष द्या. जर तुम्ही पोजिशनमध्ये काही गडबड केली तर याचा प्रभावही कमी होईल. अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ बघावा.