एक चम्मच देसी घी की किमत तुम क्या जानो? जाणून घ्याच, कारण तुमचं वजन होईल झटपट कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 05:14 PM2022-03-08T17:14:13+5:302022-03-08T17:17:18+5:30

तुपाचा आहारात समावेश करावा का? रिकाम्या पोटी तूप खावं का, असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात उभे राहतात.

one spoon desi ghee can reduce your weight if consumed empty stomach in morning | एक चम्मच देसी घी की किमत तुम क्या जानो? जाणून घ्याच, कारण तुमचं वजन होईल झटपट कमी

एक चम्मच देसी घी की किमत तुम क्या जानो? जाणून घ्याच, कारण तुमचं वजन होईल झटपट कमी

Next

रोजच्या आहारात तूप (Desi Ghee/Clarified Butter) वापरणं हे आरोग्यासाठी घातक असल्याचं काही काळापूर्वी मानलं जात होतं. त्यामुळं अनेकांनी आपल्या आहारातून तूप वर्ज्य केलं होतं; मात्र अलीकडे पुन्हा गायीच्या तुपाचा किंवा म्हशीच्या तुपाचा वापर रोजच्या आहारात करावा असं सांगितलं जात आहे.

खरं तर भारतीय खाद्यसंस्कृतीत पूर्वीपासूनच तुपाचा, लोण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. उदाहरणार्थ, पंजाबमध्ये पराठ्यापासून ते सरसों का सागपर्यंत अनेक पदार्थांत भरपूर तूप वापरलं जातं. महाराष्ट्रात वरण किंवा डाळीच्या आमटीत चमचाभर तूप घातलं जातंच. आयुर्वेदातही (Ayuerveda) रिकाम्या पोटी तूप सेवन करण्याचा सल्ला दिला आहे; मात्र खरंच तुपाचा आहारात समावेश करावा का? रिकाम्या पोटी तूप खावं का, असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात उभे राहतात.

तुपामध्ये ओमेगा थ्री फॅटी अ‍ॅसिड्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई, प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी असे घटक असतात. या पोषक तत्त्वांसह त्यात कॅलरीजचं प्रमाणही जास्त असतं. त्यामुळे तूप भरपूर प्रमाणात खाल्ल्यास वजन (Weight) वाढू शकतं. १४ ग्रॅम तुपामध्ये १२३ कॅलरीज असतात दिवसाची सुरुवात रिकाम्या पोटी एक चमचा देशी तूप खाऊन (One Spoon Deshi ghee on Empty Stomach) करावी अशी शिफारस आहारतज्ज्ञ अवंती देशपांडे यांनी केली आहे. याचे नेमके काय फायदे आहेत, याची माहिती 'टाइम्स नाऊ'ने दिली आहे.

अवंती देशपांडे यांनी सांगतिलं, 'तूप हे लोण्याचं (Butter) शुद्ध रूप आहे. आयुर्वेदानुसार, तुपामुळे लहान आतड्यांची शोषण क्षमता सुधारते आणि आपल्या जठर मार्गात म्हणजे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये आम्लयुक्त पीएच (Acidic PH) त्यामुळे कमी होतो. त्यामुळे अन्न शोषून घेण्याची आणि पचवण्याची आतड्याची (Intestine) क्षमता वाढते. तणाव किंवा झोप न लागणे, बैठ्या कामामुळे होणारे त्रास, अँटीबायोटिक्सच्या वापरामुळे आपल्या आतड्याचं आरोग्य बिघडतं.

दिवसाची सुरुवात रिकाम्या पोटी एक चमचा तूप घेऊन केल्यास आतड्याचं आरोग्य सुधारतं आणि हे त्रास दूर होतात. तसंच रिकाम्या पोटी देशी तूप खाल्ल्यानं त्वचेचं आरोग्यही सुधारतं. त्वचा नितळ, तुकतुकीत होते. पचनसंस्था स्वच्छ होते. आतड्याची कार्यक्षमता सुधारते. बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. भूक नियंत्रित राहते. चांगल्या बॅक्टेरियामुळे आतड्यांचं पोषण होतं. हाडं मजबूत होतात. तुपामुळे हृदयाचं आरोग्यही सुधारण्यास मदत होते. केसांचंही आरोग्य सुधारतं. त्याचप्रमाणे वजन कमी करण्यासाठीही याचा फायदा होतो.

Web Title: one spoon desi ghee can reduce your weight if consumed empty stomach in morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.