एएमडीग्रस्त वयोवृद्धांपैकी एक तृतीयांश रुग्णांना असतो अपघाताने पडण्याचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 08:08 PM2020-03-17T20:08:12+5:302020-03-17T20:12:02+5:30
एएमडीग्रस्त व्यक्तींनी स्थिती सुधारण्यासाठी उपचारांचा नियमितपणे पाठपुरावा करायला हवा आणि दर सहा महिन्यांनी रितसर तपासणी करून घ्यायला हवी.
मुंबई - एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन मध्ये कोणतीही गोष्टी सुस्पष्टपणे पाहता येणे अशक्य झाल्यामुळे वयोवृद्ध असलेल्या रुग्णांपैकी एक तृतीयांश (७४%) रुग्णांना पडून वा पडण्याव्यतिरिक्तच्या अन्य कारणांमुळे त्यांना बरेचदा गंभीर शारीरिक दुखापतीला सामोरे जावे लागले असल्याचे एका पाहणीतून आढळून आले आहे. एएमडी ही स्थिती केंद्रीय दृष्टी (सेंट्रल व्हिजन)च्या ऱ्हासामागचे प्रमुख कारण आहे व ६५ वर्षांहून वरच्या वयोगटातील जवळ- जवळ १०% व्यक्तींवर तसेच ७५ वर्षांच्या वयोगटातील २५% हून अधिक व्यक्तींवर याचा परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. एएमडीच्या रुग्णांमध्ये निर्माण होणाऱ्या दृष्टीदोषाचा थेट संबंध हा पडण्याच्या वाढत्या घटनांशी आहे. एमएमडी ही स्थिती वयोवृद्धांशी संबंधित काही अत्यंत गंभीर आणि सर्वत्र आढळून येणाऱ्या समस्यांपैकी एक आहे, ज्यात दुखापतींमुळे मृत्यू ओढावण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
बॉम्बे हॉस्पिटलचे ऑप्थल्मोलॉजिस्ट आणि डोळ्यांचे तसेच व्हिट्रिओरेटिनल सर्जन व मुंबई रेटीना सेंटरचे सीईओ डॉ. अजय दुदानी सांगतात, ''एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन (एएमडी) सारखे रेटिनाशी संबंधित आजार हे दुर्धर असतात. या आजाराचे वेळच्यावेळी निदान होऊन लगेच उपचार केले गेल्यास एमएमडीला प्रतिबंध करण्यास मदत मिळू शकते. ही स्थिती सुधारण्यासाठी संबंधित व्यक्तीने उपचारांचा नियमितपणे पाठपुरावा करायला हवा आणि दर सहा महिन्यांनी रितसर तपासणी करून घ्यायला हवी. या आजाराशी अपघाताने पडणे आणि नैराश्य यांसारखे इतर अनेक घटकही जोडले गेलेले आहेत, ज्यांच्यामुळे रुग्णाच्या जगण्याचा दर्जा खालावण्याचा धोका असतो. लवकर झालेले निदान आणि वेळेत मिळालेले उपचार यांच्यामुळे रुग्णांना ही आव्हाने पार करण्यासाठी मदत मिळते.''
एएमडी रुग्णांचे अपघाताने पडणे टाळण्यासाठीच्या ५ टिप्स:
1)रुग्णाची देखभाल करणा-यांनी घरामध्ये सुरक्षित वातावरण तयार करून रुग्णांना शारीरिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यास मदत केली पाहिजे. 2) व्यायामाच्या मदतीने शरीराची ताकद आणि तोल सांभाळण्याची क्षमता यांत सुधारणा घडवून आणली पाहिजे. 3) घरातील प्रकाशयोजनेमध्ये सुधारणा केली पाहिजे. 4) पांढऱ्या छडीचा वापर (अंध व्यक्तींकडून वापरले जाणारे साधन). 5) निसरड्या पादत्राणांचा वापर टाळला पाहिजे.