'या' एका व्हायरसमुळे होऊ शकता सहा प्रकारच्या कॅन्सरचे शिकार, जाणून घ्या कसा पसरतो!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 11:16 AM2020-02-06T11:16:36+5:302020-02-06T11:27:52+5:30

एचपीव्ही म्हणजे ह्यूमन पेपिलोमा व्हायरस  हा एक जीवघेणा व्हायरस आहे.

One Virus Can Cause Six-Types of Cancer | 'या' एका व्हायरसमुळे होऊ शकता सहा प्रकारच्या कॅन्सरचे शिकार, जाणून घ्या कसा पसरतो!

'या' एका व्हायरसमुळे होऊ शकता सहा प्रकारच्या कॅन्सरचे शिकार, जाणून घ्या कसा पसरतो!

Next

एचपीव्ही म्हणजे ह्यूमन पेपिलोमा व्हायरस  हा एक जीवघेणा व्हायरस आहे. सगळ्यात झपाट्याने पसरत जाणारा हा व्हायरस आहे. अनेकदा हा व्हायरस एखाद्या व्यक्तीच्या शरीरात एक्टिव्ह झाल्यानंतर त्याच्या लक्षणांना ओळखणं सुद्धा कठिण होऊन बसतं. त्यामुळे त्या व्यक्तीला हा आजार झाला आहे किंवा त्याच्यामार्फत पार्टनरला हा आजार झाला आहे. हे समजून येत नाही. पण जर तुम्हाला या आजारापासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. 

हा व्हायरस प्रायव्हेट पार्टसच्या त्वचेचा एकमेकांशी संपर्क झाल्यामुळे पसरत जातो. जर तुम्ही शरीरसंबंध ठेवत असताना कन्डोम किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सेफ्टीचा वापर केला तर तुम्ही या आजारापासून वाचू शकता. सगळ्यात आधी  यौनीत सक्रिय असलेल्या आजारापासून ८० टक्के महिला आणि पुरूष प्रभावित झालेले असतात. यूके पब्लिक हेल्थ सर्विस, एनएचएस आणि अमेरिकन एसोशिएशन ऑफ सेक्सुअल हेल्थ यांनी या आजाराच्या प्रकाराला दुजोरा दिला आहे. अमेरिकेत सगळ्यात जास्त प्रमाणात हा आजार पसरत आहे.


सगळ्यात महत्वाचे असे की एचपीव्ही मुळे ६ प्रकराचे कॅन्सर होण्याचा धोका असतो. एचपीव्ही गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी ९९ टक्के जबाबदार असतो. तसंच वजायनल कॅन्सरसाठी सुद्धा एचपीव्ही कारणीभूत असू शकतो. यामुळे गळ्याचा, तोंडाचा कॅन्सर होऊ  शकतो. एचपीव्ही  इन्फेक्शनचे कोणतेही लक्षणं दिसून येत नाही. त्याप्रकारची माहिती मिळण्यासाठी वैद्याकिय चाचण्या कराव्या लागतात. वजाइनल साइटोलॉजी आणि पेपनिकोलाई या दोन वैद्यकिय चाचण्या करून हा आजार आहे किंवा नाही अशी पडताळणी करता येते. या प्रकारच्या इन्फेक्शनची माहिती देण्यासाठी कोणतीही स्वतंत्र अशी पद्धत अद्याप प्रचलित नाही. याचे कोणतेही औषध सुद्धा नाही. जर या प्रकारच्या इन्फेक्शनमुळे गाठी झाल्यानंतर  बर्निंग अशवा केमिकल्सच्या पद्धतीचा वापर करून इन्फेक्शन दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. 

तरूणांसाठी एचपीव्ही व्हायरसपासून बचाव करण्यासाठी  लसीकरण उपलब्ध आहे. यात एचपीव्ही -16 आणि एचपीव्ही -18 या  व्हायरसपासून वाचता येतं. लसीकरणामुळे लोकांचा कॅन्सरचा धोका कमी होतो. त्यासाठी तरूण वयात लसीकरण करणं गरजेचं आहे. 

Web Title: One Virus Can Cause Six-Types of Cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.