Onion and garlic peels : कांदा आणि लसणाची साल फेकण्याची करू नका चूक, मिळतात भरपूर फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 11:11 AM2022-07-18T11:11:57+5:302022-07-18T11:13:36+5:30

Onion and Garlic Peels Body Benefits: वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट वाढण्याचं काम कांद आणि लसूण करतं. काही लोक तर कांदा कच्चाही खातात. सामान्यपणे लोक कांदा आणि लसणाची साल फेकून देतात. पण त्याचे अनेक फायदे होतात. ते काय हे जाणून घेऊ..

Onion and garlic peels body benefits : Onion peel benefits garlic skin benefits | Onion and garlic peels : कांदा आणि लसणाची साल फेकण्याची करू नका चूक, मिळतात भरपूर फायदे!

Onion and garlic peels : कांदा आणि लसणाची साल फेकण्याची करू नका चूक, मिळतात भरपूर फायदे!

Next

Onion and Garlic Peels Body Benefits: फळं आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे तर सर्वांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी वेगवेगळी फळंही खातात. पण फळांच्या सालींबाबत फार लोकांना माहीत नसतं. कांदा आणि लसणाचा रोज किचनमध्ये वापर केला जातो. वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट वाढण्याचं काम कांद आणि लसूण करतं. काही लोक तर कांदा कच्चाही खातात. सामान्यपणे लोक कांदा आणि लसणाची साल फेकून देतात. पण त्याचे अनेक फायदे होतात. ते काय हे जाणून घेऊ..

कांदा आणि लसणाची न फेकता त्यांचा वापर खत म्हणून केला जाऊ शकतो. यांपासून तयार केलेलं खत झाडांसाठी चांगलं मानलं जातं. कांदा आणि लसणाच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम, आयर्न आणि मॅग्नेशिअम तसेच कॉपर असतं.

केसांसाठी फायदेशीर 

कांद्याच्या सालीने केस चमकदार होतात. कांद्याची साल पाण्यात उकडून हे पाणी केस धुण्यासाठी वापरा. याने केस चमकदार होतात. तेच यांचा वापर डोक्याचे केस रंगवण्यासाठीही केला जातो. कांद्याची साल 1 तास पाण्यात उकडून घ्या. या पाण्याने डोक्याची हलकी मालिश करा. नंतर अर्ध्या तासाने केस धुवा. हे केसांवर नैसर्गिक डायप्रमाणे काम करतं.

क्रॅम्पची समस्या होते दूर

अनेकदा शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये क्रॅम्प येतो. याने लोकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. अशात कांद्याची साल पाण्यात 10 ते 15 मिनिटे भिजवून ठेवा. रात्री झोपण्याआधी हे पाणी प्या. याने मसल्स क्रॅम्पची समस्या दूर होण्यास मदत मिळेल.

त्वचेवरील खाज होईल दूर

अनेकदा काही लोकांच्या त्वचेवर खूप खाज येते. यासाठी ते अनेक प्रकारच्या औषधांचा वापरही करतात. पण घरीच कांदे आणि लसणाच्या सालीने ही समस्या लगेच दूर केली जाऊ शकते. पाण्यात भिजवून ठेवलेली कांद्याची आणि लसणाची साल शरीरावर खाज आहे तिथे लावा. याने बराच आराम मिळेल.

Web Title: Onion and garlic peels body benefits : Onion peel benefits garlic skin benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.