सर्दी-खोकल्यासह पावसाळ्यातील समस्या दूर करतो स्वयंपाक घरातील 'हा' पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 12:03 PM2019-07-30T12:03:18+5:302019-07-30T12:03:39+5:30

सर्दी-खोकला झाल्यानंतर आपण डॉक्टरांच्या औषधांसोबतच अनेक घरगुती उपायही करतो. पण तुम्हाला माहीत आहे का? काही घरगुती उपायांनी तुम्ही या समस्या होण्याआधीच रोखू शकता...

Onion improve immune system naturally how to prevent cough and cold in monsoon | सर्दी-खोकल्यासह पावसाळ्यातील समस्या दूर करतो स्वयंपाक घरातील 'हा' पदार्थ

सर्दी-खोकल्यासह पावसाळ्यातील समस्या दूर करतो स्वयंपाक घरातील 'हा' पदार्थ

Next

पावसाळ्यात वातावरणातील ओलाव्यामुळे अनेक बॅक्टेरियांमध्ये वाढ होते. परिणामी अनेक आजार बळावण्याचा धोका वाढतो. पावसाळ्यात सर्दी-खोकला आणि ताप या साधारण समस्या आहेत. अनेकदा या समस्या वातावरणातील बदलांमुळे होतात. हे इन्फेक्शन सामान्य असलं तरिही अनेक दिवस यांचा त्रास सहन करावा लागतो. एवढचं नाहीतर यामुळे थकवाही जाणवतो. खरं तर पावसाळ्यात अनेक बॅक्टेरिया थैमान घालत असतात. अशातच सर्दी-खोकला झाल्यानंतर आपण डॉक्टरांच्या औषधांसोबतच अनेक घरगुती उपायही करतो. पण तुम्हाला माहीत आहे का? काही घरगुती उपायांनी तुम्ही या समस्या होण्याआधीच रोखू शकता. 

आजारी पडण्याआधीच करा हा उपाय 

जास्तीत जास्त लोक आजारी पडल्यानंतरच वेगवेगळे उपाय करण्यासाठी तयार होतात. परंतु, जर तुम्ही वातावरणानुसार आधीच शरीर तयार केलं तर अनेक आजारांपासून बचाव करणं सहज शक्य होतं. जर तुम्ही आजारी पडण्याआधीच काही उपाय केले तर तुम्ही स्वतःला या समस्यांपासून दूर ठेवू शकता. तसेच आधीच उपाय केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासही मदत होते. त्यामुळे शरीराला अनेक आजारांपासून लढण्यासाठी शक्ती मिळते. 

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी काय कराल? 

पावसाळ्यामध्ये शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी एका अ‍ॅन्टी-वायरल डाएटची गरज असते. लसूण, कांदा, आलं, हळद यांसारखे पदार्थ शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आणि मजबुत करण्यासाठी मदत करतात. आज आम्ही तुम्हाला कांद्याचा वापर करून तयार करण्यात येणाऱ्या एका विशेष घरगुती उपायाबाबत सांगणार आहोत. 

कांदा वाढवतो रोगप्रतिकार शक्ती 

कांदा जेवणाची चव वाढविण्यासाठी मदत करतो. परंतु, हा आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. याच्या मदतीने तुम्ही पावसाळ्यात होणाऱ्या अनेक वायरल इन्फेक्शनपासून शरीराचा बचाव करू शकता. त्यासाठी एक लहान कांदा घेऊन तो पातळ खापांमध्ये कापून घ्या. 

या खापा 5 ते 6 तासांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवा. त्यानंतर हे मिश्रणाचे दिवसातून दोन वेळा सेवन करा. काही दिवसांपर्यंत नियमितपणे याचा वापर करा. सर्दी-खोकला यांपासून सुटका होण्यास मदत होईल. 

चव वाढविण्यासाठी यामध्ये तुम्ही मध एकत्र करू शकता. लक्षात ठेवा की, एका ठराविक प्रमाणात एकत्र करा. जास्त प्रमाणात मध टाकू नका. कांद्यामध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट व्यतिरिक्त सल्फाइड, विटामिन आणि अ‍ॅन्टीव्हायरल गुणधर्म असतात. हे बंद नाक आणि सर्दी यांसारख्या समस्यांवर अत्यंत फायदेशीर ठरतात. तसेच घशातील टॉक्सिन्स दूर करण्यासाठीही मदत करतात. 

जर खोकल्यासोबत कफ झाला असेल तर काळी मिरी पावडर शुद्ध तूपासोबत एकत्र करून त्याचं सेवन करा. याव्यतिरिक्त तुम्ही आल्याचाही वापर करू शकता. आल्याचे छोटे तुकडे करून घ्या आणि त्याचं मिठासोबत सेवन करा. 

टिप : वरील सर्व उपाय आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Onion improve immune system naturally how to prevent cough and cold in monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.