रात्री झोपताना काही लोक सॉक्समध्ये कांदा का ठेवतात? फायदे वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 12:17 PM2023-08-28T12:17:49+5:302023-08-28T12:52:35+5:30
Onion in Sock: कापलेला कांदा सॉक्समध्ये ठेवून झोपल्यास कांद्यातील पोषक तत्व त्वचेत सामावतात आणि त्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
Onion in Sock: काही लोकांना रात्री झोपताना सॉक्स घालून झोपण्याची सवय असते. तर काह लोक सॉक्समध्ये कांदा ठेवून झोपतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, हे लोक असतं का करतात. अशात तुम्हाला जर रात्री सॉक्समध्ये कापलेला कांदा ठेवून समजले तर तुम्हीही रोज असंच कराल. वेगवेगळ्या शोधांमध्ये समोर आले आहे की, कापलेला कांदा सॉक्समध्ये ठेवून झोपल्यास कांद्यातील पोषक तत्व त्वचेत सामावतात आणि त्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
आपल्या तळपायांमध्ये अशा अनेक पेशी असतात ज्या शरीराच्या वेगवेगळ्या पेशींसोबत जुळलेल्या असतात. हा उपाय चीनमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. पण कांदा सॉक्समध्ये ठेवताना ही काळजी घ्या की, कांद्याचे स्लाइस तुमच्या पायाच्या त्वचेला लागायला हवे.
वैज्ञानिक कारण
तळपायांमधील अनेक पेशी या शरीराच्या इतर पेशींसोबत जुळलेल्या असतात. या शरीरात शक्तीशाली ऊर्जेप्रमाणे काम करतात. पण जोडे-चपलांच्या वापराने या निष्क्रिय होतात. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की, डॉक्टर अनेकदा चप्पल न घालता चालण्याचा सल्ला देतात. कांद्यामुळे त्वचेवरील किटाणू आणि जीवाणू मरतात. त्यासोबतच कांद्यामध्ये असलेल्या फॉस्फोरिक नावाच्या अॅसिडमुळे रक्त शुद्ध होतं. एकदा वापरलेला कांदा पुन्हा चुकूनी वापरू नये.
रक्त होईल शुद्ध
आजकाल आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे रक्तात अनेक अशुद्ध गोष्टी मिश्रित होतात. या कारणाने अनेक आजार आपल्याला होतात. कांद्यामध्ये फॉस्फोरिक अॅसिड असतं. जे तुमचं रक्त शुद्ध करतं.
कसा वापराल कांदा?
पांढरा किंवा लाल कांद्याचे स्लाइस करा. जेणेकरून ते तुमच्या तळपायांवर नीट ठेवता येतील. कांदा पायांवर ठेवून वरून सॉक्स घाला. कांद्यामुळे रक्त शुद्ध होणे, बॅक्टेरिया आणि किटाणू मारणे हे फायदे होतात. तसेच कांद्यामुळे तुमच्या रूममधील हवाही स्वच्छ होते.
बॅक्टेरिया होतील दूर
कांद्यामध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-व्हायरल गुण असतात. दिवसभर चालल्याने आणि मातीच्या संपर्कात आल्याने किंवा घामामुळे पायांवर मोठ्या प्रमाणात किटाणू चिकटलेले असतात. यावर अनेकजण फार लक्ष देत नाहीत. तळपाय आपल्या शरीराचा शिरोबिंदू मानले जातात. त्यामुळे कांद्याचा सर तळपायांवर लावल्यास बॅक्टेरिया नष्ट होतात.