थंडीच्या दिवसात फारच फायदेशीर ठरतो हा चहा, अनेक समस्या एकाचवेळी होती दूर!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 05:03 PM2023-11-21T17:03:45+5:302023-11-21T17:04:18+5:30
Onion Tea In Winter : कांद्याचा चहा हा आयुर्वेदात एक औषधी मानला जातो. या दिवसात कांद्याच्या चहाचं सेवन केलं तर तुम्हाला थंडी वाजणार नाही.
Onion Tea In Winter :हिवाळा आला की, सर्दी-खोकला आणि इतरही आरोग्यासंबंधी समस्या डोकं वर काढतात. कारण या दिवसात इम्युनिटी कमजोर होते आणि इन्फेक्शनही लवकर होतं. अशात बरेच लोक अनेक घरगुती उपाय करतात. यातील एक खास उपाय म्हणजे कांद्याचा चहा.
कांद्याचा चहा हा आयुर्वेदात एक औषधी मानला जातो. या दिवसात कांद्याच्या चहाचं सेवन केलं तर तुम्हाला थंडी वाजणार नाही. तसेच इम्यूनिटीही वाढते. कांद्याचा चहा ऐकायला भलेही हे अजब वाटत असलं तरी याचे फायदे मात्र अनेक आहेत.
कांद्याचा चहा तयार करण्यासाठी पाणी उकडून त्यात कापलेला कांदा टाका आणि आणखी चांगल्याप्रकारे उकडू द्या. त्यानंतर हे पाणी गाळा. आता यात लिंबाचा रस किंवा चवीसाठी टी बॅगही टाकू शकता. गोडव्यासाठी यात तुम्ही मध टाकू शकता.
कांद्याच्या चहाचे फायदे
1) डायबिटीजच्या रुग्णांसाठी हा चहा फार फायदेशीर ठरु शकतो. तसेच वजन कमी करण्यासाठीही कांदा प्रभावी मानला जातो.
2) एका शोधानुसार, कांद्याचा चहा टाइप-२ डायबिटीजमध्ये आराम देण्यासाठी फायदेशीर ठरतो. तसेच कांद्याच्या चहाने फ्री रेडिकल्स नष्ट करण्यासाठी मदत करु शकतात.
3) कांद्याचा चहा कॅन्सरच्या पेशींचा विकास रोखण्यासही फायदेशीर ठरतो. खासकरुन कोलोन कॅन्सरमध्ये हा चहा फायदेशीर मानला जातो.
4) झोप न येण्याची समस्या असेल तर कांद्याचा चहा फायदेशीर आहे. याने तुम्हाला चांगली झोप येईल.
5) कांद्याच्या चहाचं सेवन केल्याने हायपरटेंशनपासून बचाव होण्यास मदत मिळते. त्यासोबतच रक्ताच्या गाठी होणे रोखण्यासही याने मदत मिळेल.