केवळ १५ मिनिटं जॉगिंंग केल्याने डिप्रेशनमधून सहज होईल सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 02:33 AM2019-03-03T02:33:58+5:302019-03-03T02:34:03+5:30
मॅसॅच्युएट्स जनरल हॉस्पिटलने केलेल्या संशोधनातून आढळून आलं आहे की, केवळ १५ मिनिटं जॉगिंग केल्यास डिप्रेशनची समस्या खूप कमी होते. जॉगिंगसाठी वेळ नसल्यास कोणता ना कोणता व्यायाम करावाच.
मॅसॅच्युएट्स जनरल हॉस्पिटलने केलेल्या संशोधनातून आढळून आलं आहे की, केवळ १५ मिनिटं जॉगिंग केल्यास डिप्रेशनची समस्या खूप कमी होते. जॉगिंगसाठी वेळ नसल्यास कोणता ना कोणता व्यायाम करावाच.
तेथील मुख्य संशोधक डॉ. डेव्हिड म्हणाले की, आमच्याकडे डिप्रेशनचे रुग्ण आले की, आम्ही त्यांना औषधांखेरीच वॉक किंवा व्यायाम करण्याचा सल्ला देतो. पंधरा मिनिटं जॉगिंग केल्यानं वा इतर शारीरिक काम केल्यानं हार्ट रेट वाढतो. त्याला स्वीट स्पॉट म्हणतात. व्यायामाआधी हार्ट रेट ६0 असेल, तर नंतर तो ९0 असणं आवश्यक आहे.
डिप्रेशनबाबतच्या संशोधनात सहा लाखांहून अधिक जणांना सहभागी करण्यात आलं होतं. त्यापैकी अनेकांना एक्सेलेरोमीटर दिला होता. त्यापैकी बऱ्याच जणांनी व्यायामानंतर स्वत:हून सांगितलं की, त्यांचे डिप्रेशन कमी होत आहे. ज्यांनी व्यायाम केला नाही, त्यांचे डिप्रेशन कायम होतं. हा आजार अजिबात अनुवंशिक नाही. आरोग्याची योग्य काळजी घेतली आणि जॉगिंग वा शारीरिक कामं केली, तर तुमची डिप्रेशनपासून सुटका होईल.