आता... जिममध्ये न जाता फक्त 7 दिवसांमध्ये वजन करा कमी!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 04:35 PM2019-02-08T16:35:15+5:302019-02-08T16:40:57+5:30
खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळे आणि काही वाईट सवयीमुंळे सध्या अनेक लोक लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. लठ्ठपणामुळे फक्त आपल्या पर्सनॅलिटिवर परिणाम होत नाही तर, यामुळे इतरही शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळे आणि काही वाईट सवयीमुंळे सध्या अनेक लोक लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. लठ्ठपणामुळे फक्त आपल्या पर्सनॅलिटिवर परिणाम होत नाही तर, यामुळे इतरही शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एवढचं नाही तर यामुळे अनेक गंभीर आजारांचा सामनाही करावा लागतो. अनेकदा यामुळे डायबिटीज, सांधेदुखी, ब्लड प्रेशर आणि किडनीसंबंधित आजार होण्याचाही धोका वाढतो. त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी असणाऱ्या उपायांची माहिती करून घेणं गरजेचं आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे का? नॉर्मल रूटीनमध्ये थोडासा बदल केल्यामुळे तुम्ही अगदी सहज वजन कमी करू शकता.
आम्ही आज तुम्हाला काही नॉर्म टिप्सबाबत सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही 3 दिवसांमध्ये साधारण 1 किलोपर्यंत वजन कमी करू शकता. वजन कमी करणं एवढंही अवघड नाही, जेवढं आपल्याला वाटतं. जर तुम्ही आम्ही सांगितलेल्या टिप्स व्यवस्थित फॉलो केल्या तर अगदी सहजपणे फक्त तीनच दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवेल.
गरम पाणी प्या
जसं आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं आहे की, गरम पाणी प्यायल्याने तुम्ही तुमचं वजन अगदी सहज आणि झटपट कमी करू शकता. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, जेव्हा आपण गरम पाणी पितो, त्यावेळी शरीरामध्ये जमा असलेलं फॅट दूर होण्यासाठी मदत होते. परिणामी वजन कमी होतं. एवढचं नाही तर बॉडी डिटॉक्स करण्यासाठीही गरम पाणी मदत करतं. जेव्हा तुमची बॉडी डिटॉक्स होते, तेव्हा मेटाबॉलिज्म वाढू लागतं आणि तुमचं वजन कमी होतं.
दररोज व्यायाम करा
वजन कमी करण्यासाठी डाएटसोबतच एक्सरसाइज करणंही अत्यंत आवश्यक आहे. कारण फॅट बर्न करण्यासाठी बॉडी अॅक्टिव्हेट ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. पण अनेकदा कामाच्या व्यापामुळे एक्सरसाइज करण्यासाठी जीमध्ये जाण्यासाठी वेळचं मिळत नाही. त्यामुळे तुम्ही घरातच वॉकिंग, जॉगिंग किंवा पायऱ्यांवरून चढ-उतार करून तुमचे फॅट्स बर्न करू शकता. खरं तर व्यायामापेक्षासुद्धा ही गोष्ट महत्त्वाची ठरते की, तुम्ही वर्कआउट कसं करता. जेव्हा तुम्ही छोट्या छोट्या एक्सरसाइज करता त्यावेळी तुमच्या शरीराला जास्त फायदा होतो.
शुगरपासून दूर रहा
वजन कमी करण्यासाठी जास्त साखर असलेले पदार्थ खाणं टाळा. खासकरून साखरेपासून तयार करण्यात येणाऱ्या मिठाया आणि चॉकलेट्सपासून दूर रहा. कारण या पदार्थांच्या अतिसेवनाने शरीरातील मेटाबॉलिज्मती प्रक्रिया हळूहळू होते. याशिवाय अशा पदार्थांचं सेवन करणं टाळा ज्यांमध्ये आर्टिफिशिअल शुगर वापरण्यात आली आहे. तसेच शुगरमुळे वजनही जास्त वाढतं.
प्रोटीन्सचा समावेश करा
लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रोटीन फार महत्त्वाची भूमिका बजावतं. प्रोटीनमुळे बॉडी शेप मेन्टेन राहण्यास मदत होते. तसेच प्रोटीन व्यवस्थित घेतल्याने शरीरामध्ये मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास मदत होते. प्रोटीनमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि भूकही लागत नाही. हे अनेक शरीरातील अनेक हार्मोन्समध्ये बदल घडून आणण्यासाठीही मदत करतं. जर तुम्ही शाकाहारी असाल तर प्रोटीनसाठी तुम्ही पनीर, दही, डाळ आणि राजमा यांचा आहारामध्ये समावेश करू शकता.