Oral hygiene benefits : नवीन टुथब्रश घेताना लक्षात ठेवा या गोष्टी, तरच पांढरेशुभ्र राहतील दात, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 05:59 PM2021-04-08T17:59:48+5:302021-04-08T18:10:04+5:30

Oral hygiene benefits : निरोगी लोकांनी मध्यम आकाराचा टुथब्रश  वापरायला हवा. या टूथब्रशचे ब्रिसल मऊ असतात. त्यामुळे दातांना जास्त त्रास होत नाही. 

Oral hygiene benefits : how to choose right toothbrush for your teeth and oral health tips by dentist | Oral hygiene benefits : नवीन टुथब्रश घेताना लक्षात ठेवा या गोष्टी, तरच पांढरेशुभ्र राहतील दात, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Oral hygiene benefits : नवीन टुथब्रश घेताना लक्षात ठेवा या गोष्टी, तरच पांढरेशुभ्र राहतील दात, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Next

तोंडाची स्वच्छ करण्यासाठी टुथब्रशचा वापर केला  जातो.  तुमचा विश्वास बसणार नाही  पण दात रोज स्वच्छ घासले गेले नाही तर ताप, व्हायरल इन्फेक्शनपासून हृदयरोगासारख्या गंभीर आजारांचाही धोका वाढू शकतो. तोंड व्यवस्थित स्वच्छ केलं नाही तर तोंडातून वास यायला सुरूवात होते. इतकंच नाही तर हिरड्यांमधून रक्तसुद्धा येतं. वेळीच या समस्या टाळण्यासाठी योग्य टुथब्रशची निवड करणं गरजेंचं असतं. म्हणून आज आम्ही तुम्हाला टुथब्रश विकत घेताना कोणती काळजी घ्यायची याबाबत सांगणार आहोत. 

अनेकजण ओरल हायजिनला महत्व (Oral hygiene benefits ) देत नाहीत. याच कारणामवळे टूथब्रश खरेदी करताना गांभीर्यानं विचार केला जात नाही. मुंबईतील डेंटल हॉस्पिटलमधील सहायक प्राध्यापक आणि डेंटिस्ट डॉ. मुसद्दिक जमाल  यांनी ओन्ली माय  हेल्थशी बोलताना योग्य टूथब्रशची निवड कशी करायची याबाबत सांगितले आहे. यावेळी एक टुथब्रश कितीवेळ वापरावा याबाबतही त्यांनी सांगितले आहे. 

मध्यम आकाराचा टूथब्रश (Medium Size Toothbrush)

निरोगी लोकांनी मध्यम आकाराचा टुथब्रश  वापरायला हवा. या टूथब्रशचे ब्रिसल मऊ असतात. त्यामुळे दातांना जास्त त्रास होत नाही. 

मऊ टूथब्रश (Soft toothbrush)

वयस्कर लोकांनी मऊ ब्रिसलच्या टूथब्रशचा वापर करायला हवा. त्यामुळे हिरड्यांना होणारा त्रास  कमी होतो. 

हार्ड ब्रिसल टूथब्रश (Hard Bristle toothbrush)

या प्रकारचे  टूथब्रश क्वचितच वापरले जातात. जेव्हा एखाद्याचे दात वाकलेले असतात तेव्हा याचा वापर होतो. ज्यांचे दात वाकडे तिकडे असतात, ब्रश त्यांच्या सर्व दातांपर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून त्यांना काही काळासाठी हार्ड टूथब्रश वापरण्यास सांगितले जाते. डॉ. जमाल म्हणतात की हार्ड ब्रशेस फक्त 5 ते 6 महिने वापरली पाहिजेत.

ब्रश करताना या चुका टाळा

तुम्हाला वाटत असेल की, सरळ-सरळ ब्रश फिरवून तुम्ही दात स्वच्छ करू शकाल तर तुम्ही चुकीचे आहात. वर आणि खाली दातांची चांगली स्वच्छता होण्यासाठी ब्रश व्यवस्थित पकडून दातांच्या छोट्या छोट्या गॅपमध्ये फिरवावा. कारण या गॅप्समध्येच किटाणू जमा झालेले असतात. 

समोर आला कोरोनाचा 'भारतीय स्ट्रेन'; महाराष्ट्रासाठी ठरतोय घातक; धोक्याचा इशारा देत तज्ज्ञ म्हणाले....

ब्रश असा असला पाहिजे जो तोंडात सहजपणे फिरवता येईल आणि कुठेही न लागता आरामात ब्रश करता येईल. अनेकजण मोठ्या आकाराचा टूथब्रश घेतात आणि त्यामुळे त्यांना ब्रश करण्यासाठी वेळही जास्त लागतो.

साध्या वाटणाऱ्या 'या' ७ लक्षणांमुळे तुम्हालाही होऊ शकतो हृदयाचा गंभीर आजार; वेळीच सावध व्हा

अनेकजण अनेक वर्ष त्यांचा एकाच टूथब्रशचा वापर करतात, त्यांना वाटतं हा टूथब्रश अजूनही चालतो. पण ब्रश जुना झाला की, त्याचा फारसा उपयोग होत नाही. दातांना सॉफ्ट ब्रशची गरज असते. जुना ब्रश वापरून वापरून रफ झालेला असतो. तज्ज्ञांनुसार, टूथब्रश दर तीन महिन्यांनी बदलायला हवा. ब्रश करण्याची योग्य पद्धत हीच आहे की, तुम्ही वेळोवेळी टूथब्रश बदला आणि ब्रश स्वच्छ ठेवा. जास्त लहान ब्रश घेऊ नका किंवा जास्त मोठाही घेऊ नका. दिवसातून किमान दोनदा ब्रश करावा.

हे लक्षात ठेवा

३ ते ४ महिन्यांनी बदला ब्रश - ब्रशमध्ये एक कोटींपेक्षा जास्त बॅक्टेरिया असतात हे तुम्हाला माहीत आहे का?  याच कारणाने ब्रश लगेच बदलणं गरजेचं आहे. अनेकजण ब्रशचे दात खराब होण्याची वाट बघतात. तुम्हीही असं करत असाल तर तुम्हाला महागात पडू शकतं. त्यामुळे अमेरिकन डेंटल असोसिएशनने ब्रश दर ३ ते ४ महिन्यांनी बदलण्यास सांगितले आहे. तसेच ब्रश चांगला स्वच्छ करणंही गरजेचं आहे.

Web Title: Oral hygiene benefits : how to choose right toothbrush for your teeth and oral health tips by dentist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.