ओरल सोरायसिस म्हणजे नक्की काय?; जाणून घ्या लक्षणं आणि कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 11:19 AM2019-10-27T11:19:00+5:302019-10-27T11:23:05+5:30

सोरायसिस एक असा त्वचारोग किंवा स्किन इन्फेक्शन आहे, जो डोक्याच्या त्वचेला केसांमध्ये, हात, पाय किंवा पाठीवर होतो. बदलत्या वातावरणात अनेक आजारांचा धोका वाढतो.

Oral psoriasis symptoms causes and treatment | ओरल सोरायसिस म्हणजे नक्की काय?; जाणून घ्या लक्षणं आणि कारणं

ओरल सोरायसिस म्हणजे नक्की काय?; जाणून घ्या लक्षणं आणि कारणं

googlenewsNext

सोरायसिस एक असा त्वचारोग किंवा स्किन इन्फेक्शन आहे, जो डोक्याच्या त्वचेला केसांमध्ये, हात, पाय किंवा पाठीवर होतो. बदलत्या वातावरणात अनेक आजारांचा धोका वाढतो. ज्यामध्ये सोरायसिस या आजाराचाही समावेश होतो. तसेच ज्या व्यक्ती आधीपासूनच या आजाराचा सामना करत आहेत. त्यांची समस्याही आणखी वाढू शकते. आज पर्यंत तुम्ही त्वचेवर होणाऱ्या सोरायसिसबाबत ऐकलं असेल पण तुम्हाला ओरल सोरायसिस माहीत आहे का? हा सोरायसिस तोंडामध्ये होत असून फारसा गंभीर नसतो. कारण बऱ्याचदा हा सोरायसिस आपोआप बराही होतो. अनेक हेल्थ एक्सपर्ट्स ही समस्या उद्भवण्यासाठी शरीरातील व्हिटॅमिन्सची कमतरता कारणीभूत असतं असं सांगतात. अनेकदा हे ओरल हेल्थ  किंवा ओरल हायजिन म्हणून ओळखतात. जर तुमच्या जिभेवर अजिबात बेदना न होणारे चट्टे दिसत असतील आणि काही दिवसांमध्ये ते आपोआप ठिक होत असतील तर ही ओरस सोरायसिसची लक्षणं आहेत. 

ओरल सोरायसिसची कारणं 

आतापर्यंत याबाबत कोणतीच ठोस माहिती उपलब्ध नाही. तसेच ही समस्या उद्भवण्याची नक्की कारणं कोणती हेदेखील अद्याप ठोसपणे सांगता येत नाही. पण अनेक हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, याचं मुख्य कारण ओरल हायजिन आणि व्हिटॅमिन्सची कमतरता असल्याचे सांगितले जाते. जास्तीत जास्त त्या लोकांमध्ये ओरल सोरायसिस दिसून येतं. ज्यांच्यामध्ये व्हिटॅमिन्सची कमतरता असते. मुख्यत्वे व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे ओरल सोरायसिसची समस्या उद्भवते. तसेच तंबाखू असणारे पदार्थ आणि धुम्रपान केल्यामुळेही ओरल सोरायसिस होऊ शकतो. 

ओरल सोरायसिसची लक्षणं 

सामान्यतः जीभ आणि तोंडात होणारे वेदनादायी लाल चट्टे ओरल सोरायसिसचं मुख्य लक्षणं आहे. काही लोकांच्या तोंडात जखम किंवा त्वचा निघण्यासारखी लक्षणंही ओरल सोरायसिसमध्ये दिसून येतात. मसालेदार पदार्थ खाल्याने तोंडात जळजळ होते. तसेच ओरल सोरायसिसचंही लक्षण असू शकतं. अनेकदा ही लक्षणं फक्त तोंडात होतं. तर काही लोकांमध्ये बाहेरील त्वचेसोबत जीभ आणि तोंडात होते. 

ओरल सोरायसिसवर उपचार 

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक हेल्थ एक्सपर्ट्सच्या सांगण्यानुसार, ओरल सोरायसिसवर थेट कोणत्याही उपचारांची गरज भासत नाही. शरीरामध्ये जर एखाद्या व्हिटॅमिनची कमतरता असेल, तर त्यासाठी औषध किंवा त्या व्हिटॅमिन्स असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. ओरल हायजिन राखण्यासही सांगितलं जातं. ओरल सोरायसिसपासून बचाव करण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. ते खालीलप्रमाणे... 

  • ओरल हेल्थ उत्तम राखण्यासाठी तोंडाची स्वच्छता करणं गरजेचं असतं. त्यासाठी सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी नक्की ब्रश करा. 
  • तंबाखू, गुटखा आणि सिगारेट यांसारख्या पदार्थांनी धुम्रपान करत असाल तर लगेच बंद करा. 
  • ओरल सोरायसिसची लक्षणं जास्त दिसू लागली तर कोमट पाण्यामध्ये मिठ एकत्र करून त्या पाण्याने गुळण्या करा. 
  • शरीरामध्ये जर एखाद्या व्हिटॅमिनची कमतरता असेल कर डॉक्टरांच्या सल्याने योग्य औषधोपचार करा. 

 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: Oral psoriasis symptoms causes and treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.