रोज एक संत्री खाल्ल्याने होता अनेक फायदे, हिवाळ्यात होणारे फायदे वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 04:28 PM2022-11-05T16:28:26+5:302022-11-05T16:29:05+5:30

हिवाळ्यात रोज संत्री खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. अनेकांना असं वाटतं की, संत्री खाल्ल्याने खोकला होईल. पण तसं नाहीये. त्याचे अनेक फायदे होतात.

Oranges benefits : Eat daily in winter for vitamin c weight loss | रोज एक संत्री खाल्ल्याने होता अनेक फायदे, हिवाळ्यात होणारे फायदे वाचून व्हाल अवाक्...

रोज एक संत्री खाल्ल्याने होता अनेक फायदे, हिवाळ्यात होणारे फायदे वाचून व्हाल अवाक्...

googlenewsNext

संत्रीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळून येतं. जे शरीराच्या इम्युनिटीसाठी फार गरजेचं असतं. थंडीच्या दिवसात इम्युनिटी वीक झाल्याने सतत सर्दी-खोकला होत राहतो. संत्री इम्यून सिस्टीम मजबूत करतं आणि आजारांपासून बचाव करतं.

हिवाळ्यात रोज संत्री खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. अनेकांना असं वाटतं की, संत्री खाल्ल्याने खोकला होईल. पण तसं नाहीये. त्याचे अनेक फायदे होतात. संत्रीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरून राहतं. ज्यामुळे जास्त खाणं टाळलं जातं. त्यामुळे तुमचं वजन वाढत नाही. तसेच यामुळेच कॅलरीचं प्रमाणही कमी होतं.

संत्री खाल्ल्याने किडनी स्टोन होण्याचा धोकाही कमी होतो. लघवीमध्ये सायट्रेटचं प्रमाण कमी असल्याने किडनी स्टोन होऊ शकतो. सायट्रेट एक सायट्रिक अॅसिड असतं जे सामान्यपणे संत्रीसारख्या आंबट फळांमध्ये आढळून येतं. किडनी स्टोन झालेल्या लोकांना सामान्यपणे संत्र्याचा ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जातो. याने लघवीतील सायट्रिक अॅसिडचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका कमी होतो.

आंबट फळं खाऊन स्ट्रोकचा धोकाही कमी होतो. असं मानलं जातं की, संत्र्यामध्ये असलेलं फ्लेवोनोइड्स हृदयरोग वाढण्याचा धोका कमी करतं. यासोबतच याने ब्लड सेल्सचं फंक्शनही अधिक चांगलं होतं.

संत्री केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर असतं. याने त्वचा तजेलदार राहते. याने त्वचेवरील दाग, पिंपल्स दूर होतात.

Web Title: Oranges benefits : Eat daily in winter for vitamin c weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.