कोरोनाच्या भीतीने काढ्याचं अतिसेवन करत असाल; तर वेळीच सावध व्हा, 'असे' होताहेत दुष्परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 08:30 PM2020-08-03T20:30:02+5:302020-08-03T20:35:24+5:30

सुरूवातीची कोरोनाची लक्षणं ही सामान्य फ्लू प्रमाणे असल्या कारणाने  कोरोनाचं संक्रमण  झालंय का अशी धास्ती लोकांना वाटते. 

Overdose of immunity booster kadha can cause health issue know what precaution | कोरोनाच्या भीतीने काढ्याचं अतिसेवन करत असाल; तर वेळीच सावध व्हा, 'असे' होताहेत दुष्परिणाम

कोरोनाच्या भीतीने काढ्याचं अतिसेवन करत असाल; तर वेळीच सावध व्हा, 'असे' होताहेत दुष्परिणाम

Next

कोरोनाच्या माहामारीत लोकांच्या मनात भीतीचं वातावरण तयार झालं आहे.  पावसाळ्याच्या वातावरणात अनेकांना साधा, ताप, सर्दी, खोकल्याची समस्या उद्भवते. सध्या कोरोनाची माहामारी असल्यामुळे आजारी पडायला लोक फार घाबरत आहेत.  सुरूवातीची कोरोनाची लक्षणं ही सामान्य फ्लू प्रमाणे असल्या कारणाने  कोरोनाचं संक्रमण  झालंय का अशी धास्ती लोकांना वाटते. 

 गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून रोगप्रतिकारकशक्ती वाढवत असलेल्या अनेक पदार्थांचा समावेश लोकांना आहारात करायला सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे अनेक औषधी गुणधर्म असलेल्या काढ्याचे सेवन मोठ्या प्रमाणावर लोक करत आहेत. कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात शरीरात गेल्यास दुष्परिणामांचा सामना करावा लागू शकतो.  काढ्याच्या अतिसेवनाचेही अनेक दुष्परिणाम आहेत. 

सोशल मीडियावर काढ्याचे वेगवेगळे उपाय व्हायरल  होत आहेत. काढ्यात मसाल्याच्या पदार्थांचा समावेश असतो. अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेता इंटरनेटवर पाहून घरी काढा तयार करत आहेत. पण त्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

काढ्याचे अतिसेवन केल्यास शरीरातील उष्णता वाढते, एसिडिटी होणं, छातीत जळजळं, हात पायांची आग होणं अशी लक्षणं दिसू शकतात. 

काळी मिरी दालचीनीच्या अतिसेवनाने पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते.

गुळवेळ, अश्वगंधा यांसारख्या औषधीं वनस्पतींच्या ओव्हरडोसमुळे शारीरिक समस्या उद्भवतात.  

काढ्याने शरीराला अनेक फायदे मिळत असले तरी अतिसेवनाचे दुष्परिणामही आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने काढ्याचे सेवन करा. 

चिंताजनक! आता कोरोना विषाणू दीर्घकाळ पाठ सोडणार नाही; WHO ची धोक्याची सुचना

पावसाळ्यात चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन; रोगप्रतिकारकशक्ती होईल कमी, वेळीच सावध व्हा

Web Title: Overdose of immunity booster kadha can cause health issue know what precaution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.