स्मार्टफोनचा अति वापर करताय? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 12:37 PM2018-07-31T12:37:56+5:302018-07-31T12:38:30+5:30

सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे, असे आपण नेहमीच ऐकतो. गेल्या दशकामध्ये तंत्रज्ञानामध्ये अनेक बदल झाले आहेत. आता संपूर्ण तंत्रज्ञान आपल्या हातातील मोबाईलमध्ये सामावलेले आहे.

The overuse of smartphones increases the risk of brain tumor | स्मार्टफोनचा अति वापर करताय? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार!

स्मार्टफोनचा अति वापर करताय? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार!

Next

सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे, असे आपण नेहमीच ऐकतो. गेल्या दशकामध्ये तंत्रज्ञानामध्ये अनेक बदल झाले आहेत. आता संपूर्ण तंत्रज्ञान आपल्या हातातील मोबाईलमध्ये सामावलेले आहे. स्मार्टफोन आता गरज राहिली नसून त्याची सवय झाली आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आपण त्यावरच अवलंबून असतो. याचे अनेक फायदे आहेत त्याचप्रमाणे याचे अनेक तोटेही आहेत. All India Institutes of Medical Sciences(AIIMS)ने केलेल्या संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, स्मार्टफोनचा जास्त वापर केल्यानं त्यातून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनमुळे ब्रेन ट्युमर होण्याच्या धोका संभवतो. 

असा वाढतो ब्रेन ट्युमरचा धोका

अनेक संशोधनातून समोर आलं आहे की, स्मार्टफोनमधून बाहेर पडणाऱ्या रेडिएशन माणसासाठी घातक असतात. तसेच या रिसर्चमधून कोणत्याही प्रकारचं निर्णायक उत्तर मिळालेलं नाही. AIIMS मार्फत करण्यात आलेल्या रेडिएशनवर झालेल्या संशोधनातून असे समोर आले आहे की, स्मार्टफोनचा जास्त वापर केल्यानं ब्रेन ट्यूमरचा धोका वाढतो. 

ब्रेन ट्यूमरचा धोका 1.33 टक्क्यांनी वाढला

संशोधकांनुसार, स्मार्टफोनच्या जास्त वापरामुळे ब्रेन ट्यूमरचा धोका 1.33 टक्क्यांनी वाढला आहे. जर 100 लोकांना ब्रेन ट्यूमर असेल तर आता या रेडिएशन वाढण्याची संख्या 133 झाली आहे. 

अशा परिस्थितीत काय करावे?

एम्सच्या न्यूरोलॉजिस्टच्या म्हणण्यानुसार, रेडिएशनचा धोका कमी करण्यासाठी नेहमी हॅन्ड्स फ्री सिस्टम (हेडफोन, हेडसेट) आणि कमी पॉवरचे ब्लूटूथ हेडफोन्सचा वापर करणं गरजेचं आहे. लहान मुलं, तरूण मुलं आणि गर्भवती महिलांना हेडफोन्सशिवाय स्मार्टफोनचा कमी वापर केला पाहिजे.

Web Title: The overuse of smartphones increases the risk of brain tumor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.