अरे व्वा! भारतात ऑक्सफोर्ड लसीच्या चाचणीला पुन्हा सुरुवात होणार; DCGI चा हिरवा कंदील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 11:46 AM2020-09-16T11:46:50+5:302020-09-16T11:49:11+5:30
CoronaVirus News & Latest Updates : ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं पुढील सूचना येईपर्यंत चाचण्या बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. सुरक्षेच्या कारणास्तव ही चाचणी सोखण्यात आली होती.
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि एक्स्ट्राजेनेका यांच्या सहयोगाने तयार करण्यात आलेल्या लसीची चाचणी काही दिवसांपूर्वी भारतातही थांबवण्यात आली होती. दरम्यान या लसीबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडीयाचे डॉ. वीजी सोमानी यांनी मंगळवारी सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडीयाला ऑक्सफोर्डची लसीच्या चाचण्या पुन्हा सुरू करण्यासाासाठी परवानगी दिली आहे.
याशिवाय DCGI ने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी नवीन स्वयंसेवकांना निवडण्यासाठीही बंदी घातली होती. आता ही बंदी उठवण्यात आली आहे. याआधी ११ सप्टेंबरला DCGI नं भारतातील पुण्यात सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडीयाच्या एक्स्ट्राजेनेका आणि ऑक्सफोर्डकडून घेण्यात येत असलेल्या चाचण्यांवर बंदी घातली होती. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं पुढील सूचना येईपर्यंत चाचण्या बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. सुरक्षेच्या कारणास्तव ही चाचणी सोखण्यात आली होती.
ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी आणि एस्ट्राजेनेका पीएलसीकडून विकसीत करण्यात आलेल्या या लसीचे सुरूवातीचे परिणाम खूपच उत्साहजनक होते. ब्रिटनमध्ये चाचणीदरम्यान डोस दिल्यानंतर एका महिला स्वयंसेवकांच्या शरीरात साईड इफेक्ट्स दिसून आले. म्हणून चाचणी थांबवण्यात आली होती. सीरम इंस्टीट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी सांगितले होते. की, भारतातल्या लसीच्या चाचणीवर याचा काहीही परिणाम होणार नाही. त्यानंतर DCGI नं भारतातील पुण्यातली सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडीयाला नोटिस दिल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात चाचणी रोखण्यात आली.
भारतात ऑक्सफोर्ड लसीची चाचणी १७ ठिकाणी सुरु असून पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वी झाल्यानंतर जगभरातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी करार करण्यात आले आहेत. तिसऱ्या टप्प्यातील लसची चाचणी अमेरिका, ब्राझील, दक्षिण अमेरिका आणि भारतात सुरू होणार आहे.
कोरोनाच्या लढाईत शास्त्रज्ञांना मोठं यश; तयार केलं कोरोनावर मात करणारं औषध
अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग स्कूल ऑफ मेडिसिन (UPMC) च्या शास्त्रज्ञांना कोरोना व्हायरसच्या उपाचारांबाबत मोठं यश मिळालं आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार याद्वारे सग्ळ्यात लहान बायोलॉजिकल मॉलेक्यूल्सना वेगळं करण्यात आलं आहे. याद्वारे कोरोना व्हायरसला न्यूट्रलाईज करता येऊ शकतं.
नवीन एका मॉलेक्यूलच्या साहाय्यानं शास्त्रज्ञांनी Ab8 हे औषध तयार केलं आहे. प्रत्यक्षात हा एंटीबॉडीचाच एक भाग आहे. सामान्य आकाराच्या एंटीबॉडीजपेक्षा १० पटीनं लहान आहे. उंदरांवर सगळ्यात आधी या औषधांचं परिक्षण करण्यात आलं होतं. हे औषध दिल्यानंतर कोरोनामुळे संक्रमित होण्याचा धोका १० टक्क्यांनी कमी झालेली दिसून आला. हे मॉलेक्यूल्स मानवी पेशींच्या संपर्कात येत नाहीत. त्यामुळे साईड इफेक्ट्स होण्याचा धोका नसतो. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णांच्या उपाचारांसाठी Ab8 हे औषध महत्वपूर्ण ठरू शकतं.
युनिवर्सिटी ऑफ पिट्सबर्गमधील संक्रामक रोग विभाग प्रमख आणि साहाय्यक लेखक जॉन मेलर्स यांनी सांगितले की, Ab8 कोरोना रुग्णांच्या उपचारात एका थेरेपीप्रमाणे काम करेल. कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी परिणामकारक ठरू शकते. या औषधाची लवकरात लवकर मानवी चाचणी करण्यात येणार आहे. या औषधाचे मुल्यांकन युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांनी केलं आहे. आतापर्यंतच्या चाचणीत हे औषध व्हायरसला शरीरात प्रवेश करण्यापासून रोखत असल्याचे दिसून आलं आहे.
हे पण वाचा-
भारीच! आता बिल गेट्स यांनी सांगितलं; भारतात कधी येणार कोरोनाची लस; जाणून घ्या
अरे व्वा! कोरोनाशी लढण्यासाठी 'या' २ गोष्टी ठरतील रामबाण उपाय; अमेरिकन तज्ज्ञांचा दावा
CoronaVaccine: चीनची कोरोना लस तयार? नोव्हेंबरमध्ये सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार