मोठा दिलासा! कोरोनाला रोखण्यासाठी भारतात लसीकरण कधी सुरू होणार? सरकारने दिले संकेत

By Manali.bagul | Published: October 14, 2020 11:40 AM2020-10-14T11:40:38+5:302020-10-14T11:56:06+5:30

CoronaVirus News & Vaccine Latest Updates : सरकारने दिलेल्या माहितीनुसार लसीवर पूर्णपणे अवलंबून नसून इतर अनेक उपायांवरही भर दिला जात आहे. 

Oxford coronavirus vaccine phase 3 trial results by december vaccination begin from next year | मोठा दिलासा! कोरोनाला रोखण्यासाठी भारतात लसीकरण कधी सुरू होणार? सरकारने दिले संकेत

मोठा दिलासा! कोरोनाला रोखण्यासाठी भारतात लसीकरण कधी सुरू होणार? सरकारने दिले संकेत

googlenewsNext

ऑक्सफोर्ड एक्स्ट्राजेनेकाकडून विकसित केली जात असलेली कोरोना लस कोविशील्ड ही लवकरात लवकर उपलब्ध होऊ शकते. या लसीचे फेस ३ मधील ट्रायल सुरू आहे. साधारणपणे नोव्हेंबरच्या शेवटापर्यंत ही लस उपलब्ध होऊ शकते. नीती आरोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या सगळ्या प्रकारच्या चाचण्या या सुरळीत सुरू आहेत. भारत बायोटेक आणि कॅडिला हेल्थकेअर ज्या लसींवर चाचण्या करत आहेत. त्या लसी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत उपलब्ध होऊ शकतात. पुढच्यावर्षी लसीकरणाला सुरूवात होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. सरकारने दिलेल्या माहितीनुसार लसीवर पूर्णपणे अवलंबून नसून इतर अनेक उपायांवरही भर दिला जात आहे. 

एकापेक्षा जास्त लसींचा वापर भारतात होणार 

जसजशा सुरक्षित आणि प्रभावी लसी उपलब्ध होतील तसतसं लसीकरण अभियानात सहभागी करून घेतलं जाणार आहे. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांन मागील काही दिवसात दिलेल्या माहितीनुसार पुढच्या वर्षाच्या सुरूवातीपर्यंत देशात लस उपलब्ध झालेली असेल. भारतात ज्या लसींची चाचणी होत आहे. त्या लसी पुढच्या वर्षी पहिल्या तीन महिन्यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत उत्पादनासाठीही उपाययोजना केल्या जात आहेत. ऑक्सफोर्ड एक्स्ट्राजेनेका आणि भारत बायोटेकची लस डबल डोजची लस असून कँडीलाचे तीनवेळा लसीकरण केलं जाईल. 

व्हायरसच्या स्वरुपात बदल झाल्यास लस निष्क्रीय ठरू शकते

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) चे प्रमुख डॉ बलराम भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हायरसच्या स्वरुपात बदल झाल्यास लसीची परिणामकता कमी होऊ शकते. डॉ. पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार लसीला अधिकृत परवानगी मिळाल्यानंतरही उपलब्ध होण्यासाठी उशिर लागण्याची शक्यता आहे. कोरोना लसीच्या वितरणासाठी आलेला खर्च सरकार शर्यंत लावून वसूल करणार नाही. सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोरोना लस विकत घेण्याासठी पर्याप्त फंड सरकारकडे आहे. जसजश्या लसी उपलब्ध होत जातील तसतसं आर्थिक गरजा वाढत जातील. सरकारने एका डोजची किंमत  १ डॉलर ठेवण्याचा विचार केला आहे. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, एकदा लस सुरक्षित आणि परिणामकारक ठरत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर किंमत निश्चित केली जाईल. रोज कापडाचा मास्क वापरता? जाणून घ्या मास्कच्या वापराबाबत समोर आलेलं नवीन संशोधन 

Epygen Biotech ने अमेरिकाच्या एका कंपनीशी भागिदारी केली आहे. या दोन कंपन्या मिळून कोरोनाच्या लसीवर काम करत आहेत. कंपनीचे सीईओ देबयान घोष यांनी 'टाइम्‍स ऑफ इंडिया'ला दिलेल्या माहितीनुसार लसीचे मानवी परिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांनी ५० कोटी डोस देण्याचा विचार केला आहे. प्रत्येक महिन्याला २ ते ४ कोटींपेक्षा जास्त डोस तयार करता येतील इतकी या कंपनीची क्षमता आहे. हर्ड इम्यूनिटीबाबत WHO ने दिली धोक्याची सुचना, कोरोनाबाबत गैरसमज ठेवल्यास पडेल महागात

WHO प्रमुखांनी दिल्या कोरोनापासून बचावासाठी नव्या गाईडलाईन्स

गर्दी टाळा- जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी सांगितले की, मैदान, नाईट क्लब, धार्मिक स्थळांसह इतर गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायला हवं. कारण गर्दी जमा झाल्याने कोरोना संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता असते.

आजारी लोकांची काळजी घ्या- घरातील वयस्कर लोक, तसचं आजारी व्यक्तीची विशेष काळजी घ्यायला हवी. जेणेकरून आरोग्य व्यवस्थेवर ताण येणार नाही आणि लोकांचा जीवसुद्धा वाचवता येईल.

आसपासच्या लोकांना माहिती द्या- स्वतःला आणि इतरांनाही संक्रमणापासून वाचवण्यासाठी कोरोनाबाबतची माहिती पटवून द्यायला हवी. याशिवाय सोशल डिस्टेसिंग, मास्कचा वापर याबाबत जनजागृती पसरवायला हवी. 'या' कारणामुळे कोरोनाला रोखण्यात चीनने मारली बाजी; लोक आता बिनधास्त करतायेत पार्ट्या

सार्वजिक आरोग्यवर लक्ष : स्वत:सह इतरांच्या आरोग्याचा विचार करता कोरोनाची लक्षणं असल्यास चाचणी करणं, स्वतःला क्वारंटाईन करणं तसंच संपर्कात आलेल्या लोकांना माहिती देऊन सावधगिरी बाळगायला सांगणं या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवे. रोज कापडाचा मास्क वापरता? जाणून घ्या मास्कच्या वापराबाबत समोर आलेलं नवीन संशोधन

Web Title: Oxford coronavirus vaccine phase 3 trial results by december vaccination begin from next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.