भारतातील पॅकेज फूड आणि पेयांबाबत ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 09:59 AM2019-08-27T09:59:23+5:302019-08-27T10:05:16+5:30

अलिकडे पॅकेटमधील किंवा डब्यातील पदार्थ आणि पेयांचं सेवन अधिक प्रमाणात वाढलं आहे.

Oxford study says India's packaged food and drinks least healthy | भारतातील पॅकेज फूड आणि पेयांबाबत ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचा धक्कादायक खुलासा

भारतातील पॅकेज फूड आणि पेयांबाबत ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचा धक्कादायक खुलासा

Next

(Image Credit : inshorts.com)

अलिकडे पॅकेटमधील किंवा डब्यातील पदार्थ आणि पेयांचं सेवन अधिक प्रमाणात वाढलं आहे. पण या पदार्थांचा आणि पेयांचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो हे वेळोवेळी वेगवेगळ्या रिसर्चमधून समोर आले आहे. अशातच ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या एका रिसर्चनुसार, भारतात विकले जाणारे डब्यातील पदार्थ आणि पेय पदार्थ सर्वात कमी प्रमाणात हेल्दी आहेत. 

कारण या पदार्थांमध्ये फॅट, सारख आणि मिठाचं प्रमाण अधिक असतं. युनिव्हर्सिटीने सांगितले की, हे निष्कर्ष १२ देशांतील ४ लाख खाद्य पदार्थांचं विश्लेषण करून जाहीर करण्यात आले आहेत. विश्लेषणानंतर जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये लंडन पहिल्या क्रमांकावर आणि सर्वात खालच्या क्रमांकावर आहे.

भारताचं रेटींग चीनपेक्षा कमी

(Image Credit : thelogicalindian.com)

विश्लेषण करणारे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या जॉर्ज इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थनुसार, वेगवेगळ्या देशांतील खाद्य पदार्थांच्या टेस्टच्या आधारावर त्यांना रेटींग देण्यात आलं आहे. रेटींगच्या यादीनुसार, अमेरिका दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

(Image Credit : www.vice.com)

रॅंकिंगच्या आधारावर पॅकेड फूडमध्ये ऊर्जा, मीठ, साखर, सॅच्युरेटेड फॅट, प्रोटीन, कॅल्शिअम आणि फायबरचं प्रमाण आहे. रॅंकिंगनुसार, सर्वात खालचा मुद्दा १/२ आहे. ज्याचा अर्थ सर्वात कमी हेल्दी फूड. तेच ५ रेटींगचा अर्थ होतो सर्वात हेल्दी पॅकेज फूड.

ऑबेसिटी रिव्ह्यू जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, लंडनला २.८३, अमेरिकेला २.८२ आणि ऑस्ट्रेलियाला २.८१ रेटींग मिळालं. तेच भारताला २.२७ आणि चीनला २.४३ असं रेटींग मिळालं. हे दोन्ही देश यादीत सर्वात खालच्या क्रमांकावर आहेत.

(Image Credit : boldsky.com)

चीनच्या पॅकेज फूडमध्ये सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण अधिक असतं. चीनच्या १०० ग्रॅम खाद्य पदार्थात ८.५ ग्रॅम साखर आहे. तर भारतात हे प्रमाण ७.३ ग्रॅम आहे. वैज्ञानिक एलिजाबेथ डूनफोर्ड म्हणाल्या की, जगभरातील लोक जास्तीत जास्त प्रोसेस्ड फूड खात आहेत. हा एक चिंतेचा विषय आहे. सुपर मार्केटमध्येही असे खाद्य पदार्थ भरपूर आहेत, ज्यात अधिक फॅट, साखर आणि मिठाचं प्रमाण असतं. यामुळे लोक वेगवेगळ्या आजारांना बळी पडत आहेत. 

Web Title: Oxford study says India's packaged food and drinks least healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.