सावधान! बोटांची हालचाल केल्यावर वेदना होणं या गंभीर आजाराचा संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 04:36 PM2023-10-02T16:36:23+5:302023-10-02T16:36:46+5:30

Diabetes : डायबिटीस या आजाराचे संकेत शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर बघायला मिळतात. बोटांवरही याचे काही संकेत दिसतात.

Pain in fingers is a sign of serious disease | सावधान! बोटांची हालचाल केल्यावर वेदना होणं या गंभीर आजाराचा संकेत

सावधान! बोटांची हालचाल केल्यावर वेदना होणं या गंभीर आजाराचा संकेत

googlenewsNext

Diabetes : बदलत्या लाइफस्टाईलमुळे लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहेत. त्यातील एक कॉमन आजार म्हणजे डायबिटीस. भारत आता डायबिटीसची राजधानी मानला जातो. एका आकडेवारीनुसार जगभरातील 42.2 कोटी लोक डायबिटीसचे शिकार आहेत. यावरून अंदाज येतो की, हा आजार किती वेगाने पसरत आहे. 

डायबिटीसमुळे हार्ट डिजीज स्ट्रोकचा धोका

जर वेळेवर डायबिटीस ओळखला गेला नाही आणि योग्य उपचार घेतले गेले नाही तर तुम्हाला हृदयरोगांचा आणि स्ट्रोकचा सामना करावा लागू शकतो. खासकरून टाइप २ डायबिटीसच्या सुरूवातीच्या लक्षणांची माहिती मिळाली तर ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवणं सोपं जातं. पुन्हा पुन्हा लघवी लागणे, जास्त तहान लागणे, तोंडात चिकटपणा अधिक जाणवणे, घासाची दुर्गंधी अधिक येणे, पिंपल्स-पुरळ अधिक येणे ही सगळी डायबिटीसची लक्षणे आहेत.

बोटांमध्ये वेदना

एक असाही संकेत आहे ज्याला डायबिटीसचा संकेत मानला जातो. बोट हलवल्यावर जर वेदना होत असेल किंवा बोट आखडलं असेल किंवा बोट मोडल्यावर जोरात वेदना होत असेल. असं एका बोटात किंवा अंगठ्यात होत असेल तर टाइप २ डायबिटीसचा संकेत असू शकतो. या लक्षणांना फ्लेक्सर टेनोसिनोवायटिस किंवा ट्रिगर फिंगर म्हणतात. ही एक अशी स्थिती आहे ज्यात बोटांच्या नसांमध्ये इन्फ्लेमेशन म्हणजे जळजळ जाणवते.

सूज आणि रेडनेसही आहे डायबिटीसचा संकेत

बोटे आखडली असतील किंवा बोट मोडल्यावर वेदना होत असेल, बोटावर रेडनेस आणि सूज असेल तर डायबिटीसचा संकेत असू शकतो. हळूहळू ही समस्या वाढू शकते आणि तुम्हाला बोट पूर्णपणे सरळ करण्यासही त्रास होऊ शकतो. अशात तुम्हाला बोट लॉक झाल्यासारखंच वाटतं. एका तज्ज्ञांनी सांगितले की, ट्रिगर फिंगरची ही समस्या साधारण ११ टक्के डायबिटीसच्या रूग्णांमध्ये बघायला मिळते. तर नॉन डायबिटीक रूग्णांमध्ये केवळ १ टक्का ही समस्या असते.

शुगर लेव्हल कमी करण्याची गरज

शरीरात जास्त काळापासून ब्लड शुगर लेव्हल वाढत असेल तर ट्रिगर फिंगरची समस्या वाढण्याची शक्यता अनेक पटीने वाढते. बोटांमध्ये होणाऱ्या या समस्येवरील उपचाराबाबत सांगायचं तर आधी ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी डाएट आणि एक्सरसाइजवर लक्ष दिलं जातं. नंतर बोटांमधील वेदना आणि जळजळ दूर करण्याचा प्रयत्न केला जातो.
 

Web Title: Pain in fingers is a sign of serious disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.