जास्त घाबरणं आणि भीती वाटणं 'या' गंभीर आजाराचं लक्षण!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 11:09 AM2018-11-27T11:09:37+5:302018-11-27T11:09:51+5:30
सामान्यपणे होणारी घबराहट आणि भीती हे अनेकांनी अनुभवलं असेल. पण हीच घाबरणं सामान्यपेक्षा जास्त असेल तर मात्र तुम्हाला पॅनिक डिसऑर्डरची समस्या असल्याचा धोका आहे.
सामान्यपणे होणारी घाबरणं आणि भीती वाटणं हे अनेकांनी अनुभवलं असेल. पण हेच घाबरणं सामान्यपेक्षा जास्त असेल तर मात्र तुम्हाला पॅनिक डिसऑर्डरची समस्या असल्याचा धोका आहे. पॅनिक डिसऑर्डर सामान्यपणे घाबरणं आणि भीती वाटणं यापेक्षा वेगळी समस्या आहे. पॅनिक डिसऑर्डर मुळात एंग्जायटी डिसऑर्डरचाच एक प्रकार आहे. या आजाराला एंग्जायटी डिस्ऑर्डरची अंतिम लेव्हल मानली जाऊ शकते. जे लोक खूप जास्त काम करतात किंवा आपल्या कामाने खूश नसतात आणि तरुणांमध्ये हा विकार जास्त प्रमाणात होतो. कोणत्या ना कोणत्या इतर समस्या त्यांना झालेली असते. मग अशात याप्रकारचा विकार झाला तर व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींबाबत घाबरु लागतात. इतकेच नाही तर या लोकांना एकटे राहण्याचीही भीती वाटते.
पॅनिक डिस्ऑर्डरची लक्षणे
- छोट्या छोट्या गोष्टींची अचानक भीती वाटणे.
- अचानक हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढणे, जास्त घाम येणे, हात आणि पाय सुन्न होणे या समस्या दिसतात.
- याप्रकारच्या मानसिक विकारामुळे व्यक्तीच्या व्यवहारात मोठा बदल होतो. सोबतच त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचाही धोका असतो.
- श्वास घेण्यास त्रास होणे.
- हृदय आणि छातीत वेदना होणे.
- श्वास भरुन येणे
- पोटात दुखणे आणि थकवा जाणवणे.
काय आहे कारणे?
आनुवांशिकता
अशाप्रकारचा विकार परिवारातील एखाद्या व्यक्ती आधी असेल तर तो पुढच्या पिढ्यांनाही होतो. हा विकार कॅन्सर आणि हृदयाशी संबंधित विकारा इतकाच गंभीर आहे.
मेंदूमध्ये होणारे रासायनिक बदल
मेंदूमध्ये होणाऱ्या रासायनिक बदलामुळे याप्रकारचा विकार होणे स्वाभाविक आहे. याच कारणाने मानसिक विकार उत्पन्न होतात.
कोणत्याही प्रकारची सवय
अनेकदा तरुणांना औषधे आणि अल्कोहोलची फार जास्त सवय लागल्यानेही पॅनिक अटॅक होऊ लागतो. याकडे आपण औषधांचे आणि अल्कोहोलचे साइड इफेक्ट म्हणूनही पाहू शकतो. बदलत्या लाइफस्टाइलमुळे तरुणाई अल्कोहोलच्या जाळ्यात अडकत आहे. त्यामुळे त्यांना याचा अधिक धोका आहे.
तणाव
अनेकदा व्यक्ती आपल्या कामाने, परिवारामुळे किंवा इतरही कोणत्या कारणाने तणावग्रस्त होऊ लागतो. यामुळेही पॅनिक डिस्ऑर्डर होण्याचा धोका असतो. जास्त तणाव असणेही व्यक्तीचा मानसिक विकार दर्शवतो. आज बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना तणावाचा मोठा सामना करावा लागतो आहे. खासकरुन तरुणांना याचा जास्त फटका बसताना दिसत आहे. त्यामुळे त्यांना या विकाराचा अधिक धोका संभवतो.
उपचार
या विकाराचा उपचार करण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ पीडित व्यक्तीसोबत बोलतो, त्याच्या जीवनाबाबत जाणून घेतात आणि नंतर त्यानुसार उपचार करतात. कॉगनिटीव्ह बिहेविअरल थेरपीच्या मदतीनेही याचा उपचार केला जातो. यातून पीडित व्यक्तीमध्ये सकारात्मक विचार निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. जेव्हा एखादा मानसिक विकार थेरपीच्या माध्यमातून बरा होत नाही. तेव्हा डॉक्टर औषधांच्या मदतीने यावर उपचार करतात.