पपई कापल्यावर कधी फेकू नका त्यातील बीया, फायदे वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 10:17 AM2022-10-06T10:17:50+5:302022-10-06T10:18:08+5:30

How To Eat Papaya Seeds: न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी सांगितलं की, पपईच्या बियांचं सेवन का गरजेचं आहे.

Papaya seeds benefits : How to eat these seeds | पपई कापल्यावर कधी फेकू नका त्यातील बीया, फायदे वाचून व्हाल अवाक्

पपई कापल्यावर कधी फेकू नका त्यातील बीया, फायदे वाचून व्हाल अवाक्

googlenewsNext

How To Eat Papaya Seeds: पपई एक फारच कॉमन आणि कमी पैशात मिळणारं फळ आहे. सगळे लोक हे फळं आवडीने खातात. याने होणारे फायदेही अनेकांना माहीत आहेत. जेव्हा हे फळं खाण्यासाठी कापलं जातं तेव्हा त्यात बीया दिसतात. लोक या बीया काढून फेकतात. पण जर तुम्ही याच्या बियांचा वापर कराल तर आरोग्याला अनेक फायदे होतील. पपईच्या या बीया फेकण्याऐवजी एका डब्यात जमा कराव्या. न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी सांगितलं की, पपईच्या बियांचं सेवन का गरजेचं आहे.
पपईच्या बियांचे फायदे

1) सर्दी-पळश्यापासून आराम

पपईच्या बियांमध्ये पोलिफेनोल्स आणि फ्लेवोलोइड्ससारखे अॅंटी-ऑक्सिडेंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी करतात. ज्यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होऊ लागतो. तुम्ही सर्दी-पळश्यासारख्या समस्यांपासूनही दूर राहता.

2) कोलेस्ट्रॉल लेवल कमी होईल

पपईच्या बियांमध्ये फॅटी अॅसिड्स असतं जे रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करतं. जेव्हा तुमच्या धमण्यांमध्ये प्लाक कमी तयार होतो तेव्हा ब्लड प्रेशर कमी होतं. अशा तुम्ही हार्ट अटॅक, कोरोनरी ऑर्टरी डिजीज आणि ट्रिपल वेसेल्स डिजीजसारख्या हृदयरोगांपासून वाचू शकता.

3) वजन होईल कमी

पपईच्या बियांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. जे डायजेशन चांगलं करण्यात फायदेशीर असतं. जर पचनतंत्र चांगलं राहिलं तर तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होणार नाहीत आणि वाढणारं वजनही कमी होईल.

कसं करावं या बियांचं सेवन?

आता प्रश्न हा आहे की, पपई बियांचं सेवन कसं करावं? त्यासाठी या बीया पाण्याने धुवा, नंतर त्या उन्हात वाळत घाला. नंतर त्याचं पावडर तयार करा. हे पावडर तुम्ही शेक, मिठाई ज्यूससोबत सेवन करा. कारण याची टेस्ट कडवट असते. त्यामुळे गोड पदार्थासोबत याचं सेवन करा.
 

Web Title: Papaya seeds benefits : How to eat these seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.