पॅरासिटामोलसहीत ५२ औषधं डुप्लिकेट, जाणून घ्या ओरिजनल औषध कसं ओळखाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 12:39 PM2024-09-27T12:39:40+5:302024-09-27T12:40:08+5:30

Fake Medicine : नुकताच सेंट्रल ड्रग्स स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गेनायजेशन (CDSCO) चा रिपोर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात पॅरासिटामोलसहीत ५३ औषधांना NSQ चं लेबल देण्यात आलंय.

Paracetamol and 52 more medicine fail in test, know how to check originality | पॅरासिटामोलसहीत ५२ औषधं डुप्लिकेट, जाणून घ्या ओरिजनल औषध कसं ओळखाल!

पॅरासिटामोलसहीत ५२ औषधं डुप्लिकेट, जाणून घ्या ओरिजनल औषध कसं ओळखाल!

Fake Medicine : नुकताच अनेक रोज वापरल्या जाणाऱ्या औषधांबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे. ज्यात ५० पेक्षा जास्त औषधं टेस्टमध्ये फेल झाले आहेत. जून २०२३ मध्ये भारताने काही औषधांवर बंदी घातली होती. ज्यात पॅरासिटोमोलचा देखील समावेश होता. मात्र, आजही बरेच लोक या औषधाचं सेवन करताना दिसतात. हे एक असं औषध आहे ज्यावर लोकांचा फार विश्वास आहे. सामान्यपणे अंगदुखी, डोकेदुखी, ताप असल्यावर या औषधाचं सेवन केलं जातं. पण हे औषध तुमच्यासाठी घातक ठरू शकतं.

नुकताच सेंट्रल ड्रग्स स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गेनायजेशन (CDSCO) चा रिपोर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात पॅरासिटामोलसहीत ५३ औषधांना NSQ चं लेबल देण्यात आलंय. याचा अर्थ या औषधांची क्वालिटी चांगली नाही. ही औषधं डुप्लिकेट आहेत. या रिसर्चनुसार, भारतात विकली जाणारी जवळपास २५ टक्के औषधे ओरिजनल नाहीत. ही औषधे फेक कंपन्यांद्वारे मोठ्या कंपन्यांच्या लेबलची नक्कल करून विकली जात आहेत. 

कोणती औषधं टेस्टमध्ये फेल?

सीडीएससीओच्या रिपोर्टमध्ये पॅरासिटामोल, पेनकिलर डिक्लोफेनाक, अॅंटी-फंगल औषध फ्लुकोनाजोल, व्हिटॅमिन डी सप्लीमेंट, बीपी आणि डायबिटीसचं औषध, तसेच अॅसिड रिफ्लक्सच्या औषधांचा समावेश आहे.

बाजारात मिळतात डुप्लिकेट औषधं

ही सगळी औषधं नामांकित कंपनीच्या नावाने बाजारात आली होती. जेव्हा संबंधित कंपन्यांकडे स्पष्टीकरण मागण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, लेबलवर जो बॅच नंबर आहे त्याची निर्मिती त्यांनी केलेली नाही. याचा अर्थ त्यांच्या नावावर एखादी फेक कंपनी डुप्लिकेट औषधं बाजारात विकत आहेत. 

कसं ओळखाल डुप्लिकेट औषध?

डुप्लिकेट किंवा फेक कंपन्यांद्वारे बनवण्यात येणारी औषधं ही ओरिजनलच दिसतात. पण त्यांमध्ये काही सामान्य चुका असतात जसे की, लेबलिंगमध्ये स्पेलिंगमध्ये चुका किंवा ग्रामरमध्ये चुका. त्यामुळे नेहमी औषधं खरेदी करताना लेबलवरील माहिती व्यवस्थित वाचावी. त्याशिवाय ऑगस्ट २०२३ नंतर तयार करण्यात आलेल्या औषधांच्या पॅकेजिंगवर बारकोड किंवा क्यूआर कोड असतो. तो स्कॅन केल्यावर औषधाची पूर्ण माहिती मिळते. डुप्लिकेट औषधांवरील बारकोड किंवा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर फार काही माहिती समोर येत नाही.

Web Title: Paracetamol and 52 more medicine fail in test, know how to check originality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.