सावधान! रोजच्या 'या' दोन गोष्टींमुळे वाढू शकतो ब्रेन कॅन्सरचा धोका, रिसर्चमधून करण्यात आला खुलासा....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 09:56 AM2021-01-13T09:56:00+5:302021-01-13T09:58:19+5:30
इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सरमध्ये प्रकाशित या रिपोर्टनुसार, हा परजीवी मेंदूमध्ये अल्सरच्या रूपात असू शकतो आणि इन्फ्लेमेशनसाठी जबाबदार ठरू शकतो.
दूषित पाणी आणि अर्धवट शिजलेल्या मांसात आढळणारा एक साधारण परजीवी लोकांमध्ये ब्रेन कॅन्सरचा कारण ठरू शकतो. सोमवारी वैज्ञानिकांनी एका रिपोर्टमध्ये असा दावा केला आहे. याचे त्यांना पुरावे मिळाले आहेत की, टोक्सोप्लाज्मा गोंडी किंवा टी गोंडी परजीवीने संक्रमित लोकांममध्ये फार घातक ग्लायोमा(एकप्रकारचा ट्यूमर) विकसित होण्याचा जास्त धोका राहतो. या रिसर्चनुसार, जगातील २० ते ५० टक्के लोक या परजीवामुळे संक्रमित झाले आहेत.
इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सरमध्ये प्रकाशित या रिपोर्टनुसार, हा परजीवी मेंदूमध्ये अल्सरच्या रूपात असू शकतो आणि इन्फ्लेमेशनसाठी जबाबदार ठरू शकतो. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या डिपार्टमेंट ऑफ पॉप्युलेशनचे एपिडेमायोलॉजिस्ट जेम्स हॉज यांच्या नेतृत्वात त्यांच्या टीमने आणि कॅन्सर सेंटर अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या एल. ली मॉफिट यांनी ब्लड सॅम्पलमध्ये टी गोंडी परजीवीच्या अॅंटीबॉडी आणि ग्लायोमाचा धोका यासंबंधी अभ्यास केला. यासाठी त्यांनी लोकांना दोन गटात विभागलं.
कुणाला जास्त धोका?
या रिसर्चसाठी अमेरिकन कॅन्सर प्रिव्हेंशन स्टडी - II न्यूट्रिशन कोहॉर्टमध्ये १११ लोकांना आणि नॉविजन कॅन्सर रजिस्ट्रीमधील ६४६ लोकांना सहभागी करून घेतलं होतं. वैज्ञानिकांनी सांगितले कीी, ग्लायोमाचा धोका अशा लोकांना जास्त असतो ज्यांच्यात टी गोंडी अॅंटीबॉडीचं प्रमाण जास्त होतं.
आणखी अभ्यासाची गरज
वैज्ञानिकांनी सांगितले की, 'या स्टडीचा निष्कर्ष टी गोंढी इन्फेक्शन आणि ग्लायोमाचा धोका यांच्यातील संबंध याची शक्यता आहे. याची पुष्टी स्वतंत्र शोधात केली जावी'. प्रमुख वैज्ञानिक हॉज म्हणाले की, 'याचा अर्थ नाही की, टी गोंडी सर्वच स्थितीत निश्चितपणे ग्लायोमाचं कारण ठरतं. ग्लायोमा असलेल्या काही लोकांमध्ये टी गोंडी अॅंटीबॉडी आढळल्या सुद्धा नाही'.
या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, 'हा रिसर्च सांगतो की ज्या लोकांमध्ये टी. गोंडी परजीवीच्या संक्रमणाचा धोका अधिक असतो. त्यांच्यातच ग्लायोमा विकसित होण्याची शक्यता जास्त राहते. मात्र, यावर आणखी मोठ्या प्रमाणात रिसर्च करण्याची गरज आहे'.