मोबाइल हातात घेतल्याशिवाय मुले जेवतच नाहीत; सवय कशी मोडाल? ही ट्रिक ठरेल फायदेशीर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 01:10 PM2024-05-31T13:10:24+5:302024-05-31T13:15:35+5:30

मुलांच्या हातात मोबाईल दिला की मग ही मुलं अगदी पटकन जेवायला तयार होतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

parenting tips for how to break child smart phone addiction know about how to get off the screen | मोबाइल हातात घेतल्याशिवाय मुले जेवतच नाहीत; सवय कशी मोडाल? ही ट्रिक ठरेल फायदेशीर 

मोबाइल हातात घेतल्याशिवाय मुले जेवतच नाहीत; सवय कशी मोडाल? ही ट्रिक ठरेल फायदेशीर 

Parenting Tips :  बदलत्या जीवनशैलीचा लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येत आहे. अगदी कोरोनाकाळापासून मुलांचे मैदानी खेळ बंद झाले असून, व्हिडीओ गेम, मोबाइल आणि लॅपटॉपवर खेळत राहण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. ही मुले हल्ली दिवसभर मोबाईलला चिकटलेली असतात. आजकाल हा विषय पालकांच्या चिंतेचा बनत आहे. त्यात जंकफूडनेही भर घातली आहे. मुलांची आहार शैली बदलली आहे. त्यामुळे लठ्ठपणात वाढ असल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. 

लठ्ठपणा म्हटलं की, आपल्याला वाटतं हा प्रश्न केवळ तरुण आणि प्रौढांमध्ये आजार आढळतो. परंतु गेल्या काही वर्षांत बदलत्या जीवनशैलीमुळे लहान मुलांमधील लठ्ठपणाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ दिसून येत आहे. कोवळ्या वयात मुलांच्या आरोग्यावर याचे दुष्परिणाम जाणवू लागल्याने पालकांसाठी हे चिंतेचे कारण बनले आहे. 

पौष्टिक आहार गरजेचा-

१) हा प्रश्न इतका गंभीर झाला आहे की आज अनेक लहान मुलांच्या रुग्णालयामध्ये लठ्ठपणावरील उपचारासाठी विशेष कक्ष निर्माण करण्यात आले आहेत.

२) चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. त्याचबरोबर जेनेटिक आणि हॉर्मोनल बदलामुळे लठ्ठपणा येत असल्याचे दिसून येत आहे. लठ्ठपणा हा आजार असून, गेल्या काही वर्षांपासून विविध रोगांना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. 

३) लहान वयातच मुले लठ्ठ होऊन त्यांच्यामध्ये श्वसनविकारच्या व्याधी बळावल्या आहेत. योग्यवेळी उपचार केले, तर लठ्ठपणा कमी केला जाऊ शकतो. मुलांना पौष्टिक आहार देणे गरजेचे असून, वेळीस आहारतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.

लहान मुलांमधील लठ्ठपणा आता काळजीचे कारण बनले आहे. मुलावरील लठ्ठपणा रोखण्याची सुरुवात अगदी लहानपणापासून झाली पाहिजे. मोबाइलमुळे मुले एका ठिकाणी बसून असतात. त्यात ते हाताला मिळेल असे जंकफूड खातात. त्यामुळे मुले लठ्ठ होतात. 

सवय कशी मोडणार? 

मोबाइलचा वापर कमी करत जाणे आणि शेवटी तो थांबविणे हा एकच त्यावरील उपाय आहे. मोबाइल हे खेळणं नव्हे हे त्यांना पटवून देणं गरजेचं आहे. घरात अशी खेळणी असावीत ज्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचाली होतील. या व्यतिरिक्त अभ्यासात किंवा इतर गोष्टींमध्ये त्यांच मन कसं रमेल याकडे लक्ष द्यावं. मुलांच्या हातातून मोबाईलचा सतत होणार वापर कमी करण्यासाठी त्यांच्या आवडीचे छंद जोपासण्यास त्यांना प्रवृत्त करा. त्यांना ज्या ज्या गोष्टी आवडतात त्यात त्यांना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करा. 

लठ्ठपणास हे कारणीभूत-

१) तळलेले पदार्थ

२) चॉकलेट

३) सॉफ्ट ड्रिंक 

४) हवा बंद डब्यातील पदार्थ

५) साखर आणि मीठ मोठ्या प्रमाणात असलेले पदार्थ

६)  व्हिडीओ गेम, मोबाइल, लॅपटॉपवर खेळत राहणे

Web Title: parenting tips for how to break child smart phone addiction know about how to get off the screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.