पावसाळ्यात मुलांना होणारे इन्फेक्शन टाळायचे कसे? वाचा तज्ज्ञांना सांगितलेल्या काही खास टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 12:17 PM2024-06-24T12:17:35+5:302024-06-24T12:19:28+5:30
पावसाळा जितका आल्हाददायक असतो तितकाच विषाणू, जिवाणू संसर्गवाढीसाठी हा उत्तम काळ मानला जातो.
Parenting Tips For Monsoon : पावसाळा जितका आल्हाददायक असतो तितकाच विषाणू, जिवाणू संसर्गवाढीसाठी हा उत्तम काळ मानला जातो. लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्याने या दिवसांत त्यांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
पावसाळ्यात हवेतून होणारे आणि दूषित अन्न आणि पाण्यातून होणारे आजार असे दोन प्रकार आहेत. विषाणूजन्य ताप, मलेरिया, डेंग्यू यासारख्या संसर्गाची लागण लहानग्यांना होण्याची शक्यता असते. ठराविक आजारांच्या लक्षणांमध्ये ताप, अंगदुखी, पुरळ उठणे, उलट्या होणे आणि पोटात दुखणे यांचा समावेश आहे. या दिवसांत आढळणाऱ्या कोणत्याही लक्षणांकडे पालकांनी दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अन्न आणि पाण्यामुळे होणारे आजार हे लहान मुलांमधील निर्जलीकरणास कारणीभूत ठरतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
डेंग्यू रोखण्यासाठी...
डेंग्यू-मलेरिया साचलेले पाणी हे डासांच्या उत्पत्तीचे ठिकाणं आहेत. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी जार, फुलदाण्या, वॉटर कूलर, घराबाहेर किंवा डस्टबिनमध्ये साचलेले पाणी काढून टाका आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि कोरडा ठेवावा अन्यथा डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू- मलेरियासारख्या आजाराचा सामना करावा लागू शकतो.
तज्ज्ञ सांगतात...
१) पावसाळ्यात आपल्या शरीराची प्रतिकारकशक्ती चांगली ठेवणे आवश्यक आहे. सकस, नियमित संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.
२) मुले आजारी असल्यास त्यांना शाळेत पाठवू नये. शासनाने लागू केलेल्या लसीकरण कार्यक्रमातील वयोमानानुसार लहान मुलांचे सर्व लसीकरण होणे आवश्यक आहे त्यामुळे घरात तसेच परिसरात स्वच्छता राखा.
सर्दी-खोकला-
वातावरणात बदल झाल्यावर रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्यांच्या आरोग्यावर तत्काळ परिणाम होतो. अनेक मुलांना या काळात सर्दी-खोकला यांसारख्या आजारांचा सामना करावा लागतो.
काय काळजी घ्याल?
१) उघड्यावरील खाद्यपदार्थ टाळा : मुलांना उकळलेले पाणी द्या, बाहेरच्या अन्न पदार्थाचे सेवन टाळा, घरी बनवलेल्या ताज्या अन्नाचे सेवन करणे आणि फळे आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करावा.
२) स्वच्छता राखा या काळात पालकांनी मुलांच्या चांगल्या आणि स्वच्छतेच्या सवयीकडे विशेष लक्ष द्यायला हवे.
३) खेळून आल्यानंतर हातपाय धुणे, स्वच्छ खाणे, पाणी उकळून पिणे या सवयी जोपासायला हव्यात.
टायफॉइड, कावीळची भीती-
पावसाळ्यात बाहेरील टायफॉइड, कावीळची भीती पाणी पिणे तसेच उघड्यावरील खाद्यपदार्थ खाल्ल्यावर पोटदुखी, जुलाब, टायफॉइड, कावीळ यांसारख्या आजारांची शक्यता अधिक असते.