डायबिटीसच्या रुग्णांचा रात्री बीपी वाढला तर होऊ शकतो मृत्यू, रिसर्चमधुन धक्कादायक खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 03:35 PM2021-10-11T15:35:32+5:302021-10-11T15:35:42+5:30

टाइप १ किंवा टाइप २ मधुमेह ( diabetes) असलेल्या ज्या लोकांचा बीपी रात्री वाढतो त्यांनी सावध राहिले पाहिजे. कारण रात्री वाढलेला बीपी त्यांचा जीव सुद्धा घेऊ शकतो.

patient with type 1 and type 2 diabetes can die during the night if blood pressure increases research says | डायबिटीसच्या रुग्णांचा रात्री बीपी वाढला तर होऊ शकतो मृत्यू, रिसर्चमधुन धक्कादायक खुलासा!

डायबिटीसच्या रुग्णांचा रात्री बीपी वाढला तर होऊ शकतो मृत्यू, रिसर्चमधुन धक्कादायक खुलासा!

googlenewsNext

डायबिटीस हा एक क्रॉनिक आजार आहे ज्यामध्ये तंदुरुस्त राहण्यासाठी आणि लक्षणे नियंत्रणात ठेवण्यासाठी रक्तातील साखरेच्या पातळीवर सतत लक्ष ठेवणे आवश्यक असते. पण टाईप १ आणि टाइप २ डायबिटीसमुळे ग्रस्त असलेल्या व्यक्तीला दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी ब्लड प्रेशरची पातळी नियंत्रणात ठेवणे देखील तितकेच महत्वाचे असते.

रिसर्चमधुन धक्कादायक खुलासा
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या हायपरटेन्शन सायंटिफिकमध्ये अलीकडेच सादर केलेल्या तब्बल २१ वर्षांच्या अभ्यासानुसार, टाइप १ किंवा टाइप २ मधुमेह ( diabetes) असलेल्या ज्या लोकांचा बीपी रात्री वाढतो त्यांनी सावध राहिले पाहिजे. कारण रात्री वाढलेला बीपी त्यांचा जीव सुद्धा घेऊ शकतो. ज्या लोकांचा ब्लड प्रेशर रात्री स्थिर किंवा कमी असतो त्यांच्यापेक्षा हा वाढणा-या लोकांचा बीपी दोन पट जास्तच आहे. जर तुम्हाला देखील डायबिटीस असेल तर तुम्हाला देखील पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेण्याची गरज आहे.

साधारणत: रात्री झोपेच्या दरम्यान ब्लड प्रेशर (blood pressure)कमी होतो. जर रात्रीच्या वेळी ब्लड प्रेशर पुरेश्या प्रमाणात कमी होत नसेल तर त्याला नॉन-डिपिंग म्हणतात. जर बीपी दिवसा ऐवजी रात्री वाढू लागला तर या स्थितीला रिव्हर्स डिपिंग असे म्हणतात. हा असामान्यपणे वाढलेला ब्लड प्रेशर टाइप १ आणि टाइप २ डायबिटीस असलेल्या लोकांच्या हृदयाशी संबंधित समस्यांसाठी व मृत्यू होण्याचा धोका वाढवण्यास जबाबदार ठरतो. त्यामुळे मधुमेहाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला बीपी नियंत्रित करण्याचा सल्ला तज्ञांकडून हमखास दिला जातो.

१० पैकी १ व्यक्तीला धोका
अभ्यासात असं दिसून आलं की टाइप १ ( type 1 diabetes) किंवा टाइप २ (type 2 diabetes) मधुमेह असलेल्या १० पैकी १ व्यक्तीला रिव्हर्स डिपरची समस्या असू शकते. इटलीच्या पिसा विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ क्लीनिकल एंड एक्सपेरीमेंटल मेडिसनच्या इंवेस्टीगेटर मार्टिना चिरियाको म्हणतात की, प्रत्येक तज्ज्ञाने टाइप १ आणि टाइप २ मधुमेह असलेल्या लोकांमधील रक्तदाब तपासावा.

Web Title: patient with type 1 and type 2 diabetes can die during the night if blood pressure increases research says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.