वेळीच लक्ष द्या, नाहीतर फुड अ‍ॅलर्जी पडू शकते महागात! वाचा लक्षणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 01:17 PM2021-07-12T13:17:00+5:302021-07-12T13:19:34+5:30

नेहमीच्या आहारापेक्षा काही उटलसुलट खाल्लं तर आपल्याला लगेच फूड अ‍ॅलर्जी होते. पोटात दुखणं, मळमळणं, उलटी होणं असे प्रकार सुरू होतात. यावर उपाय काय? घ्या जाणून

Pay attention in time, otherwise food allergies can be expensive! Read Symptoms and Remedies | वेळीच लक्ष द्या, नाहीतर फुड अ‍ॅलर्जी पडू शकते महागात! वाचा लक्षणं आणि उपाय

वेळीच लक्ष द्या, नाहीतर फुड अ‍ॅलर्जी पडू शकते महागात! वाचा लक्षणं आणि उपाय

googlenewsNext

अनेकदा भूक लागली की आपण बाहेरच्या पदार्थांना पटकन प्राधान्य देतो ज्यात फास्टफूडचं प्रमाण जास्तच असतं. बाहेरचं खाताना त्याकडे आपण लक्ष देत नाही. पण नेहमीच्या आहारापेक्षा काही उटलसुलट खाल्लं तर आपल्याला लगेच फूड अ‍ॅलर्जी होते. पोटात दुखणं, मळमळणं, उलटी होणं असे प्रकार सुरू होतात. साधारणत: लहान मुलांमध्ये या अ‍ॅलर्जीचे प्रमाण अधिक आढळून येतं. मात्र बदललेल्या आहारपद्धतीने तरूणांना देखील ही अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता आहे.

कधीकधी ही अ‍ॅलर्जी जीवावर सुद्धा बेतू शकते. वातावरणात होणारे बदल हे फूड अ‍ॅलर्जी होण्यास कारणीभूत ठरू शकतात. म्हणूनच पावसाळा आणि उन्हाळा या दोन ऋतुंमध्ये अ‍ॅलर्जी होण्याची जास्त शक्यता असते. उन्हाळ्यात बाहेरील तीव्र उन्हामुळे खाद्यपदार्थांवर परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून या दोन्ही ऋतुंमध्ये डॉक्टर पचायला हलका असा आहार घ्यायला सांगतात.

फूड अ‍ॅलर्जीची लक्षणं

  • डोकं दुखणं
  • पोटात दुखणं
  • मळमळणं
  • जुलाब होणं
  • उलट्या होणं
  • घशात खवखवणं
  • श्वास घेण्यास त्रास होणं
  • काय उपाय कराल

चण्यास जड असे पदार्थ, जे खाल्याने त्रास होत असेल असे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. अ‍ॅलर्जी झाली हे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. अ‍ॅलर्जीवर योग्य वेळी उपचार न झाल्यास अनेक आजार ओढवू शकतात.

Web Title: Pay attention in time, otherwise food allergies can be expensive! Read Symptoms and Remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.