रात्री दोनपेक्षा अधिक वेळा लघवीला जाता? मग तुम्हाला 'या' गंभीर आजाराचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 11:43 PM2022-02-21T23:43:04+5:302022-02-21T23:43:23+5:30

रात्री वारंवार लघवी होत असेल तर वेळीच सावध व्हा

peeing habits more than usual could be dangerous sign of your health | रात्री दोनपेक्षा अधिक वेळा लघवीला जाता? मग तुम्हाला 'या' गंभीर आजाराचा धोका

रात्री दोनपेक्षा अधिक वेळा लघवीला जाता? मग तुम्हाला 'या' गंभीर आजाराचा धोका

Next

काही जणांना रात्री अनेकदा लघवीला होतं. रात्री वारंवार लघवीला होणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. रात्री वारंवार लघवी होणं आरोग्याच्या दृष्टीनं समस्या आहे. तिला वैद्यकीय भाषेत नोक्टूरिया म्हटलं जातं. दुर्लक्ष केल्यास ही समस्या गंभीर रुप धारण करते.

रात्री एकदा-दोनदा लघवीला जाणं सामान्य समजलं जातं. मात्र त्यापेक्षा अधिक वेळा लघवी होणं आरोग्यासाठी चिंताजनक आहे. रात्री वारंवार लघवी होत असेल आणि काही वेगळे बदल जाणवत असतील तर विलंब न करता डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला.

रात्री वारंवार लघवीला होण्यामागे अनेक अडचणी असू शकतात. कॅफिन, मद्यपान, धूम्रपान, ताणतणाव आणि अस्वस्थता या कारणांमुळे ही समस्या उद्भवते. कॅफिनचा समावेश अधिक असलेल्या चहा, कॉफीमुळे वारंवार लघवी होते. काही शीतपेयांमुळेदेखील ही समस्या निर्माण होते.

वारंवार लघवीला होण्याची समस्या नोक्टूरियाशी संबंधित असू शकते. सामान्यपणे हा आजार फार धोकादायक नसतो. नोक्टूरिया आजार वाढतं वय आणि हार्मोनच्या बदलाशी संबंधित आहे. याचे परिणाम अनेकदा भयंकर असतात. यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इंफेक्शनचा धोका निर्माण होऊ शकतो. पुढे जाऊन पोटदुखी आणि लघवी न होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. 

Web Title: peeing habits more than usual could be dangerous sign of your health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.