'या' वयोगटातील लोकांना कोरोना संक्रमणाचा धोका जास्त; वेळीच माहीत करून घ्या कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 12:20 PM2020-07-23T12:20:47+5:302020-07-23T12:26:12+5:30

 ज्या लोकांमध्ये आजारांशी लढण्याची शक्ती असते. त्यांना हा आजार झाल्यास लवकर रिकव्हर होता येतं.

People in this age group have a higher risk of corona infection; Find out the reasons | 'या' वयोगटातील लोकांना कोरोना संक्रमणाचा धोका जास्त; वेळीच माहीत करून घ्या कारणं

'या' वयोगटातील लोकांना कोरोना संक्रमणाचा धोका जास्त; वेळीच माहीत करून घ्या कारणं

Next

कोरोना संक्रमितांचा आकडा जगभरात दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचं संक्रमण  होत असलेल्यांची संख्या भारतातही दिवसेंदिवस वाढत आहे. तसंच कोरोनातून बाहेर येत असलेल्यांची संख्याही वाढली आहे. माय उपचारशी बोलताना डॉ. अजय मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार  ज्या लोकांमध्ये आजारांशी लढण्याची शक्ती असते. त्यांना हा आजार झाल्यास लवकर रिकव्हर होता येतं. वयस्कर लोकांना कोरोनाचं संक्रमण होण्याचा आणि संक्रमण झाल्यास मृत्यू होण्याचा धोका जास्त असतो.

मे महिन्यात कोरोना संक्रमितांचा रिकव्हरी रेट ५० टक्के होता. तर आता देशातील रिकव्हरी रेट ६२.०९ टक्के इतका आहे. म्हणजेच देशातील स्थिती हळूहळू सुधारत आहे. कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांमध्ये ४५ वयापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांचा समावेश आहे.  दरम्यान देशातील ८० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांनीही कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार ८५ टक्के मृत्यू होत असलेल्या लोकांमध्ये ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक समाविष्ट आहेत.

जे लोक आधीच कोणत्याही आजारानेग्रस्त आहेत म्हणजे हार्ट अटॅक, डायबिटीस किडनी आणि फुफ्फुसांच्या आजाराचे रुग्णं आहेत. अशा लोकांना  कोरोनाचा धोका जास्त असतो. सगळ्यात मोठं कारण म्हणजे रोगप्रतिकारकशक्ती, ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती कमी असते. त्यामुळे आजारांशी सामना करण्यासाठी लागणारी पुरेशी ताकद नसते. अशा स्थितीत  कोरोना व्हायरस शरीरात प्रवेश करून वेगवेगळ्या अवयवांना नुकसान  पोहोचवतो. गंभीर स्थितीत रुग्णांचा मृत्यू होतो. 

जे लोक आधीपासूनच आजारी आहेत अशांनी काळजी घेणं गरजेचं आहे. ४५ पेक्षा जास्त वयोगटातील लोकांनी रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी व्हिटामीन सी चा आहारात समावेश करणं गरजेचं आहे. १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची रोगप्रतिकारकशक्तीही विकसित झालेली नसते. त्यासाठी सतत साबणाने हात धुत राहा. घरातील वयस्कर लोकांना शक्यतो बाहेर पाठवू नका. कोणत्याही प्रकारची  लक्षणं दिसत असतील तर स्वतःला क्वारंटाईन करा. घरातील इतर सदस्यांपासून लांब राहा. जास्त तीव्रतेने लक्षणं जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी करा. 

दिलासादायक! अखेर 'या' देशात पुढच्या महिन्यापासून सर्वसामान्यांना दिली जाणार कोरोनाची लस

आदार पूनावाला म्हणतात, भारतात 'एवढ्या' रुपयांत मिळणार कोरोना लस; जाणून घ्या किंमत

Web Title: People in this age group have a higher risk of corona infection; Find out the reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.