किलर लूक मिळवण्यासाठी लोक करतात रायनोप्लास्टी, 'या' सर्जरीने नेमका कसा बदलतात लूक?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 03:58 PM2020-02-05T15:58:45+5:302020-02-05T16:00:25+5:30
अनेक लोक सुंदर लुक मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात.
अनेक लोक सुंदर लुक मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. कारण इतरांपेक्षा वेगळं आणि आकर्षक दिसायचं असतं. इराणमध्ये राहत असलेल्या अनेक लोकांच्या राहणीमानात गेल्या काही वर्षांपासून बदल घडून येत आहे. फक्त महिलाच नाही तर पुरूष सुद्धा आपल्या सौंदर्याच्या बाबतीत खूप जागारूक आहेत. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणंचे अनेक लोकं किलर लूक मिळवण्यासाठी रायनोप्लास्टी करतात.
इराणमध्ये राहत असलेले लोक सगळ्यात जास्त रेनोप्लास्टी करतात. मागिल अनेक वर्षांपासून पुरूषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अधिक आहे. पण तुम्हाला माहीत आहे का याच रायनोप्लास्टीचा वापर करून तुम्ही तुमचं तारूण्य टिकवून ठेवू शकता.
(Image credit- metroentcentre)
रायनोप्लास्टी सर्जरीमध्ये नाकाला कापून लहान करण्यात येतं. यात नाकाचं टोक कापून सुंदर चेहरा मिळवण्यासाठी ट्रिटमेंट केली जाते. या सर्जरीनंतर महिलांचा तसंच पुरूषांचा चेहरा आकर्षक दिसायला लागतो. नाकाच्या आकारात बदल करण्याची अत्याधुनिक आणि वैज्ञानिक पद्धत ही आहे. ही एक कॉस्मेटिक सर्जरी आहे. ज्याचा वापर करून तुम्ही नाकाचा आकार लहान करू शकता. पसरलेल्या नाकाला नोजट्रिल्स, नुकीली टिप, नासल ब्रिजवर आकार दिला जातो.
(image credit-rhinoplasty)
जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीसारखे समान नाक हवं असेल तर तुम्हाला तसंच मिळेल असं नाही. तुम्ही नाकाला रिशेप करताना लहान, सपाट नाकाला गोल करण्यात येते. असं केल्यामुळे तुमचं नाक आधीपेक्षा चांगलं दिसतं. राइनोप्लास्टीचे उद्दिष्ट असे असते की नाकाला तोंडावरच्या इतर फिचर्स सोबत संतुलित करता येईल. रायनोप्लास्टी या सर्जरी नंतर तुम्ही त्याच दिवशी घरी सुद्धा जाऊ शकता. तुम्हाला जास्त दिवस क्लिनिकमध्ये रहावं लागत नाही. नाकाला काही दिवस बॅडेज सुद्धा असेल. ८ ते १० दिवसांनी तुम्ही बॅंडेज काढू शकता. ( हे पण वाचा-पेपर अँन्ड सॉल्ट दाढी ठेवण्याचा हटके ट्रेन्ड, हॅण्डसम दिसण्याचा 'हा' बेस्ट फंडा!)
फाइनल रिजल्ट दिसण्यासाठी १ वर्ष लागत असतं. नोज रिशेपिंगनंतर नाक आणि त्याच्या आजूबाजूच्या भागाला सूज आलेली असते. ही सूज हळूहळू कमी होत जाते. नोज रिशेपिंगनंतर एका आठवड्यात नोज टिपचं स्वेलिंग पूर्णपणे ठिक होतं. पण पूर्णपणे फरक दिसून येण्यासाठी १० ते १२ महिन्यांचा कालावधी लागतो. ( हे पण वाचा-सकाळी उठल्यानंतर 'या' चुका कराल तर वयाआधीच म्हातारे दिसाल)