जास्त झोप घेणाऱ्यांनी वेळीच व्हा सावध; अभ्यासातून नवा धक्कादायक खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 12:12 PM2018-10-11T12:12:30+5:302018-10-11T12:14:26+5:30
जास्त वेळ झोपल्याने काय होतं याचा अनुभव तुम्हाला सामान्यपणे आला असेलच. जास्त झोपल्याने अनेकदा आळस, अंगदुखी अशा लगेच जाणवणाऱ्या समस्या होतात हे तुम्हाला माहीत असेलच.
जास्त वेळ झोपल्याने काय होतं याचा अनुभव तुम्हाला सामान्यपणे आला असेलच. जास्त झोपल्याने अनेकदा आळस, अंगदुखी अशा लगेच जाणवणाऱ्या समस्या होतात हे तुम्हाला माहीत असेलच. पण एका अभ्यासानुसार, जास्त झोपल्याने काय नुकसान होतं याचा खुलासा झाला आहे.
या अभ्यासानुसार, जास्त वेळ झोपल्याने मेंदुच्या काम करण्याच्या प्रकियेला नुकसान पोहोचतं. या अभ्यासातून हे समोर आलं आहे की, जे लोक कमी झोप घेतात किंवा जे लोक रात्री ७ ते ८ तासांपेक्षा अधिक झोप घेतात त्यांच्या समजून आणि जाणून घेण्याची क्षमता कमी होते.
कॅनडातील वेस्टर्न यूनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांनुसार, गेल्यावर्षी जून महिन्यात सुरु करण्यात आलेल्या झोपेसंबंधी या रिसर्चमध्ये जगभरातून ४० हजार लोकांना सहभागी करुन घेण्यात आले होते. या ऑनलाईन अभ्यासातून अभ्यासकांना आढळले की, मेंदुचं काम व्यवस्थित चालण्यासाठी ७ ते ८ तासांची झोप आवश्यक आहे आणि डॉक्टरी इतकीच झोप घेण्याचा सल्ला देतात. हा रिसर्च स्लीप मॅगझिनमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
यूनिव्हर्सिटीचे अॅड्रियन ओवन म्हणाले की, 'आम्हाला जगभरातील लोकांच्या झोपण्याच्या सवयींबाबत जाणून घ्यायचं होतं. लॅबमध्ये छोट्या प्रमाणावर झोपेवर रिसर्च झाला आहे, पण आम्हाला हे जाणून घ्यायचं होतं की, जगातील लोकांच्या झोपण्याच्या सवयी काय आहेत'.
ते म्हणाले की, 'जवळपास अर्ध्या सहभागी लोकांनी ६.३ तासांची झोप घेतल्याचं सांगितलं. ही वेळ अभ्यासात आवश्यक योग्य वेळेपेक्षा कमी होती. यातून एक आश्चर्यकारक खुलासा हा झाला की, जे लोक ४ तास किंवा त्यापेक्षा कमी झोप घेतात त्यांचा परफॉर्मन्स हे ते त्यांच्या वयापेक्षा ९ वर्ष लहान असल्यासारखा होता. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे झोप सर्वच वयस्कांना समान रुपाने प्रभावित करते'.