'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये अननस? पडू शकतं महागात...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 11:42 AM2024-08-31T11:42:13+5:302024-08-31T11:43:04+5:30
Pineapple Disadvantages : अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी अननस खाणं नुकसानकारक ठरू शकतं. कुणी अननसाचं सेवन करू नये हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Pineapple Disadvantages : अननस एक टेस्टी आणि शरीराला अनेक पोषक तत्व देणारं फळ आहे. भरपूर लोक आवडीने अननस खातात. यातून व्हिटॅमिन सी, अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात मिळतं. मात्र, अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी अननस खाणं नुकसानकारक ठरू शकतं. कुणी अननसाचं सेवन करू नये हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
अननस कुणी खाऊ नये?
१) गॅस आणि पोटाची समस्या असणारे
अननसामध्ये ब्रोमेलिन नावाचं एझांइम असतं जे पचनक्रियेसाठी चांगलं असतं. पण याने काही लोकांचं पोट उत्तेजित होतं. पोटासंबंधी समस्या असलेल्या लोकांना अननसाचं सेवन कमी प्रमाणात केलं पाहिजे किंवा करूच नये.
२) गर्भवती महिला
गर्भावस्थेदरम्यान अनेक महिला अननसाचं सेवन करतात, पण यातील ब्रोमेलिनने गर्भाशयात समस्या होऊ शकते. याने गर्भपाताचा धोका वाढतो. त्यामुळे गर्भावस्थेत अननसाचं सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
३) अल्सर असलेल्या रूग्णांनी
जर तुम्हाला पोटात किंवा आतड्यांमध्ये अल्सर असेल तर अननसाचं सेवन केल्यावर तुम्हाला असहजता आणि वेदना होऊ शकते. ब्रोमेलिन आणि अॅसिडिक नेचरमुळे तुमच्या अल्सरची स्थिती आणखी खराब होऊ शकते.
४) शुगर असलेल्यांनी
अननसाचा ग्लालसेमिक इंडेक्स मध्यम असतो. पण यात शुगरचं प्रमाण जास्त असतं. डायबिटीस किंवा हाय शुगर लेव्हलच्या रूग्णांनी अननसाचं सेवन केलं तर शुगर वाढू शकते. शुगरच्या रूग्णांमुळे ब्लड शुगर लेव्हल प्रभावित होतं. अशा लोकांनी अननसाचं सेवन कमी प्रमाणात करावं.
५) अॅलर्जी असलेल्यांनी
काही लोकांना अननसाची अॅलर्जी होऊ शकते. अॅलर्जीच्या लक्षणांमध्ये खाज, सूज किंवा त्वचेवर लाल चट्टे यांचा समावेश आहे. जर कुणाला अननस खाल्ल्यावर अशी लक्षणं दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.