मासिक पाळीदरम्यान रक्तस्त्राव जास्त होतोय? 'हे' उपाय करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 04:39 PM2018-11-01T16:39:43+5:302018-11-01T16:41:43+5:30
मासिक पाळीदरम्यान अनेकदा काही मुलींना किंवा महिलांना अचानक जास्त रक्तस्त्राव होतो. असं कधीकधी होणं फार साधारण आहे. पण हेच जर प्रत्येकवेळी होत असेल तर मात्र याकडे दुर्लक्ष करू नये.
मासिक पाळीदरम्यान अनेकदा काही मुलींना किंवा महिलांना अचानक जास्त रक्तस्त्राव होतो. असं कधीकधी होणं फार साधारण आहे. पण हेच जर प्रत्येकवेळी होत असेल तर मात्र याकडे दुर्लक्ष करू नये. जास्त रक्तस्त्राव होत असेल आणि जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलंत तर एनीमिया, मूड स्विंग, थकवा आणि ताण यांसारख्या समस्या होऊ शकतात. अनेक महिला हेवी ब्लिडींग रोखण्यासाठी हार्मोनल मेडिसिन्स घेतात. पण तुम्ही काही घरगुती उपयांनी या समस्येपासून सुटका करून घेऊ शकता.
1. मुळा
रक्तस्त्राव जास्त होत असल्यास मुळ्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. मुळ्याची भाजी करताना त्यामध्ये मुळ्याच्या पानांचाही वापर करा. मासिक पाळीदरम्यान ही भाजी खाणं गरजेचं असतं. त्यामुळे रक्तस्त्राव नियंत्रणात राहतो.
2. आलं
तुम्ही आलं पाण्यामध्ये टाकून ते पाणी उकळवून घ्या. चवीसाठी तुम्ही यामध्ये साखर किंवा मध मिक्स करू शकता. दिवसातून 2 ते 3 वेळा प्यायल्याने रक्तस्त्राव रोखण्यास मदत होते.
3. चिंच
चिंचामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर आणि अॅन्टी-ऑक्सिडंट असतात. जे रक्त गोठवून जास्त रक्तस्त्राव थांबवण्यास मदत करतात. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी चिंच खाणं फायदेशीर ठरतं.
4. पपई
पपईचा वापर पाळी येण्यासाठी करण्यात येतो. परंतु कच्च्या पपईचे सेवन केल्याने पाळीदरम्यान होणारा जास्त रक्तस्त्राव रोखण्यास मदत होते.
जास्त रक्तस्त्राव होण्याची कारणं :
1. हार्मोनमधील असंतुलन
मासिकपाळीदरम्यान शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होतात. पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव होण्याचं हे देखील एक कारण ठरू शकतं. पाळी बंद होण्याच्या एक वर्षआधीपासून हार्मोन्समध्ये सर्वात जास्त बदल घडतात. अशातच जास्त रक्तस्त्राव होण्याची समस्या उद्भवते.
2. इन्फेक्शन
गर्भाशयामध्ये इन्फेक्शन झालं असल्यास महिलांना या दिवसांमध्ये जास्त रक्तस्त्राव होतो. अशावेळी दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
3. एंडोमेट्रियल पॉलीप्स
महिलांना प्रामुख्याने गर्भाशयामध्ये हा आजार होतो. ही समस्या होण्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु यावर उपचार करणं सहज शक्य आहे. त्यामुळे अशी समस्या उद्भवल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
4. सर्वाइकल कॅन्सर
सर्वाइकल कॅन्सरमध्ये गर्भाशय नियंत्रणाच्या बाहेर जातं. तसेच यामुळे शरीराच्या उतर अवयवांवरही प्रभाव पडतो. 90 टक्क्यांपेक्षा जास्त सर्वाइकल कॅन्सर, ह्यूमन पेपिलोमा वायरसमुळे होतो. यावर उपचार करण्यासाठी कीमोथेरेपी आणि रेडियशन दिल्या जातात.