सामान्य वाटणाऱ्या लक्षणांमुळे उद्भवू शकतो जीवघेणा पेरिटोनियल कॅन्सर, जाणून घ्या लक्षणं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 01:21 PM2020-05-13T13:21:50+5:302020-05-13T13:31:35+5:30
पेरिटोनियल कॅन्सर त्वचेच्या एपिथील्यल सेल्समध्ये विकसीत होत जातो.
कॅन्सरचे एक दोन नाही तर शंभरपेक्षा जास्त प्रकार आहेत. पण आपल्याला फक्त कॅन्सरचे कॉमन असणारे काही प्रकार माहीत आहेत. त्यापैकीच एक पेरिटोनियल कॅन्सर आहे. हा कॅन्सरचा प्रकार जीवघेणा असून ऑन्कोलॉजिस्ट या कॅन्सरबाबत योग्य माहिती देऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला कर्करोगतज्ञांनी दिलेल्या पेरिटोनियल कॅन्सरची लक्षणं सांगणार आहोत.
काय आहे पेरिटोनियल कॅन्सर
पेरिटोनियल कॅन्सर त्वचेच्या एपिथील्यल सेल्समध्ये विकसीत होत जातो. पोटाच्या आतल्या भागात झाकल्या गेलेल्या लाइनिंगला 'पेरिटोनियम असं म्हणतात. त्यामुळे या कॅन्सरला पेरिटोनियल कॅन्सर म्हणतात. या पेरिटोनियममुळे अंतर्गत अवयव म्हणजेच लहान आतडे, मोठे आतडे, मुत्राशय, गर्भाशय आणि मलाशयाची सुरक्षा होत असते. पेरिटोनियम लायनिंगमध्ये एक घट्ट द्रवपदार्थ बाहेर येत असतो. ज्यावेळी या कॅन्सरची लक्षणं जाणवतात. त्यावेळी अनेकदा हा कॅन्सर शेवटच्या स्टेजला पोहोचलेला असतो.
(Image credit- cure today)
पेरिटोनियल कॅन्सरची लक्षणं
तीव्र पोटदुखी
एब्डोमिनल ब्लोटिंग
मुत्रमार्गात त्रास जाणवणं
वजायनातून पांढरे पाणी बाहेर येणं
आंबट ढेकर, उलट्या होणं
जास्त न खाता पोट भरल्यासारखं वाटणं
अचानक वजन कमी जास्त होणं.
श्वास घ्यायला त्रास होणं.
(image credit-target ovarian cancer)
कारणं
पुरूषांच्या तुलनेत या प्रकारच्या कॅन्सरचा सगळ्यात जास्त धोका महिलांना असतो. वाढत्या वयात या कॅन्सरचा धोका वाढत जातो. मध्यम वयीन तसंच वयस्कर लोकांना या आजाराचा जास्त धोका असतो. अनुवांशिकतेमुळे सुद्धा हा आजार उद्भवतो. लक्षणं जाणवत असल्यास तपासणी करणं गरजेंच आहे. लठ्ठपणाचे शिकार असलेल्या लोकांना या प्रकारच्या कॅन्सरची समस्या उद्भवू शकते. महिलांना मेनोपॉजच्या स्थितीत म्हणजेच ४५ ते ५५ वयोगटात हा कॅन्सर होण्याची शक्यता असते. यासाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी करणं गरजेंच आहे.
(फुफ्फुसांच्या आजारांचं कारण ठरू शकतं चेस्ट इन्फेक्शन; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय)
(आता अँटीजन टेस्टमुळे १५ मिनिटात कोरोनाची तपासणी होणार; कशी होते 'ही' टेस्ट जाणून घ्या)