फिजिकल अॅक्टिव्हिटी आणि एक्सरसाइज? - दोघांत काय फरक? तुम्हाला नेमकी कशाची गरज आहे?
By Admin | Published: June 1, 2017 05:47 PM2017-06-01T17:47:22+5:302017-06-01T17:47:22+5:30
तुम्ही भले दिवसभर बिझी असाल, पण खरंच तुम्ही फिट आहात का? बघा, गडबड करू नका..
- मयूर पठाडे
तुम्ही रोज किती फिजिकल अॅक्टिव्हिटी करता? आणि किती एक्सरसाइज करता? मुळात फिजिकल अॅक्टिव्हिटी आणि एक्सरसाइज यातला फरक तुम्हाला माहीत आहे का? फिट राहायचं, तर तुम्हाला नेमकी कशाची गरज आहे? फिजिकल अॅक्टिव्हिटीची कि एक्सरसाइजची?
फिजिकल अॅक्टिव्हिटी आणि एक्सरसाइज यात म्हटला तर बराच फरक आहे आणि म्हटलं तर फार थोडा.. पण आपल्या आरोग्यावर त्याचा होणारा परिणाम मात्र बऱ्यापैकी असतो.
सोप्या शब्दांत सांगायचं तर फिजिकल अॅक्टिव्हिटी म्हणजे आपल्या स्रायुंचं आकुंचन. म्हणजे आपण कोणतीही कृती करीत असतो, तेव्हा होतं ते आपल्या स्रायूंचं आकुंचन.
उदाहरणार्थ तुम्ही घरात काही काम करता आहात, घराचे जिने चढता आहात, बागकाम करता आहात, चालता आहात.. ही झाली तुमची फिजिकल अॅक्टिव्हिटी आणि त्यातून होतं ते स्रायूंचं आकुंचन.
तीव्रता किती?
फिजिकल अॅक्टिव्हिटी आणि एक्सरसाइज यांची तीव्रता वेगवेगळी असते.
कसं ओळखायचं हे?
फिजिकल अॅक्टिव्हिटी करीत असताना सर्वसाधारणपणे आपण सहजपणे बोलूही शकतो. एक्सरसाइज करताना तुम्ही बोलूही शकत असाल तर तुमच्या व्यायामाची तीव्रता साधारणपणे मध्यम स्वरुपाची आहे. पण बोलताना तुम्हाला थांबावं लागत असेल, धाप ;लागत असेल, तर तुमच्या एक्सरसाइजची तीव्रता बऱ्यापैकी जास्त आहे.
एक्सरसाइजचे फायदे
एक्सरसाइजचे मुख्यत: चार फायदे आहेत.
१- तुमच्या हृदयाची शक्ती वाढवणे.
२- मसक्युलर स्ट्रेंग्थ वाढवणे.
३- एन्ड्यूरन्स (सहनशक्ती) वाढवणे.
४- तुमची फ्लेक्जिबिलिटी (लवचिकता) वाढवणे.
या गोष्टी फिजिकल अॅक्टिव्हिटीनं साध्य होतीलच असं नाही..