दररोज एक्सरसाइज केल्याने महिलांमध्ये 'हा' धोका कमी; वाढत्या वयातही होतो फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 11:52 AM2019-11-09T11:52:59+5:302019-11-09T11:56:36+5:30
आरोग्य उत्तम राखण्यासाठी अनेकदा व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात येतो. फिजिकल एक्सरसाइजचे फायदे आपल्या सर्वांनाच माहीत आहेत.
(Image Credit : National Institute on Aging - NIH)
आरोग्य उत्तम राखण्यासाठी अनेकदा व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात येतो. फिजिकल एक्सरसाइजचे फायदे आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का? फिजिकल अॅक्टिव्हिटी वयोवृद्ध महिलांमध्ये फ्रॅक्चरचा धोका कमी करण्यासाठीही परिणामकारक ठरते. एका संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, फिजिकल अॅक्टिव्हिटी आणि मोनोपॉजनंतर महिलांमध्ये होणाऱ्या फ्रॅक्चरचा संबंध दिसून आला. हा रिसर्च अमेरिकेतील बफेलो स्कून ऑफ हेल्थमध्ये करण्यात आला आहे.
सदर संशोधन 77 हजार महिलांवर करण्यात आलं असून जवळपास 14 वर्षांपर्यंत हे संशोधन सुरू होतं. या संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, ज्या महिला फिजिकली अॅक्टिव्ह होत्या किंवा घरातील काम करत होत्या. त्यांच्यामध्ये हिप फ्रॅक्चरचा धोका 18 टक्क्यांनी कमी झाला होता. तसेच टोटल फ्रॅक्चरचा धोका 6 टक्क्यांनी कमी होता.
संशोधनाचे प्रमुख संशोधकांचं असं म्हणणं आहे की, संशोधनाच्या निष्कर्षांमधून असं सिद्ध झालं आहे की, फिजिकल एक्सरसाइजच्या अनेक फायद्यांपैकी एक म्हणजे, फ्रॅक्चरचा धोका कमी होणं हा आहे.
दरम्यान, मोनोपॉजनंतर महिलांमध्ये फ्रॅक्चर होणं ही एक साधारण समस्या आहे. यामुळे त्यांची आत्मनिर्भरता कमी होते. त्यांची शारीरिक क्षमता मर्यादित होते आणि मृत्यू दरही वाढतो. अशातच संशोधनांच्या निष्कर्षांनुसार, अनेक महिलांना फायदा होऊ शकतो.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही दावा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.)