लहान मुलांचं माती, चॉक खाणं समजू नका सामान्य, असू शकतो 'हा' गंभीर आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 09:30 PM2022-06-23T21:30:53+5:302022-06-23T21:31:05+5:30

पिका डिसऑर्डर हा आपल्या आहाराशी संबंधित आहे. ज्या लोकांना पिकाचा त्रास होतो त्यांना नेहमी वाळलेल्या पेंटचे तुकडे, बर्फ, साबण, बटणे, चिकणमाती, वाळू, सिगारेटचे अवशेष, राख, रंग, खडू (Eating Sand And Soap) इत्यादी गैर-खाद्य पदार्थ खाण्याची इच्छा असते.

pica disorder in children is related to eating mud or chalk | लहान मुलांचं माती, चॉक खाणं समजू नका सामान्य, असू शकतो 'हा' गंभीर आजार

लहान मुलांचं माती, चॉक खाणं समजू नका सामान्य, असू शकतो 'हा' गंभीर आजार

googlenewsNext

पिका डिसऑर्डर (PICA Eating Disorder) हा एक अतिशय विचित्र आजार आहे. परंतु तो सामान्यतः अनेक लोकांमध्ये आढळतो. Psychiatry.org मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, पिका डिसऑर्डर मुख्यतः गर्भवती महिला आणि लहान मुलांमध्ये आढळतो. बहुतेक लहान मुले आणि गरोदर स्त्रिया माती आणि इतर अनेक गोष्टी खाऊ लागतात. पिका डिसऑर्डर हा आपल्या आहाराशी संबंधित आहे. ज्या लोकांना पिकाचा त्रास होतो त्यांना नेहमी वाळलेल्या पेंटचे तुकडे, बर्फ, साबण, बटणे, चिकणमाती, वाळू, सिगारेटचे अवशेष, राख, रंग, खडू (Eating Sand And Soap) इत्यादी गैर-खाद्य पदार्थ खाण्याची इच्छा असते.

पिका डिसऑर्डर हा शारीरिक दुर्बलतेसह एक मनोविकार आहे, ज्यामध्ये रुग्ण अनावश्यक गोष्टी खाऊ लागतात. ज्यामुळे शरीरात अनेक रोग आणि विष पसरू शकते. अशा गोष्टी खाल्ल्याने गंभीर आजार देखील होऊ शकतात. त्याचबरोबर अन्न नलिकेमध्ये वस्तू अडकणे, आतड्यांसंबंधी संसर्ग, बॅक्टेरिया, व्हायरस आणि विषबाधा होण्याची शक्यता असते. लोहाची कमतरता, अशक्तपणा असेही त्रास होऊ शकतात.

 सामान्य उपचाराने पिका बरा होतो आणि काहीवेळा हा त्रास आपोआपच कमी होतो. परंतु प्रत्येक वेळी असे होईलच असे नाही. ज्या लोकांची प्रतिकारशक्ती आधीच कमकुवत आहे. अशा लोकांमध्ये हा आजार बराच काळ टिकू शकतो.

पिका डिसऑर्डरमुळे होणारे खाण्याचे विकार
- पिका डिसऑर्डर अनेक कारणांमुळे होऊ शकतो. लोह (Iron Deficiency), जस्त (Zinc Deficiency)किंवा इतर पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे हा आजार होण्याची शक्यता असते.

- ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर (Obsessive Compulsive Disorder) आणि स्किझोफ्रेनियासारखे (Schizophrenia) मानसिक आजारही पिका डिसऑर्डरचे कारण असू शकतात. अशा परिस्थितीत रुग्णाला अखाद्य पदार्थ खाण्याची सवय लागते आणि त्याला अशा गोष्टींची चव विशेष आवडू लागते.

- अनेक तज्ञांच्या मते काही लोकांमध्ये पिका डिसऑर्डर उद्भवण्याचे कारण कुपोषण (Malnutrition) आणि डायटिंग (Dieting Side Effect) हेदेखील असू शकते. असे केल्याने रुग्णांना पोट भरलेले वाटते.

पिका डिसऑर्डरचे निदान
- तुम्हाला पिका डिसऑर्डरची लक्षणे (Symptoms Of PICA Disorder) दिसली तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. सुरुवातीच्या काळात हा आजार सहज बरा होऊ शकतो.

- पिका डिसॉर्डरची लक्षणे शरीरात दिसायला सुरुवात होताच तुम्ही तुमची रक्त तपासणी करून घ्यावी. जेणेकरुन शरीरात कशाची कमतरता आहे हे शोधता येईल.

- प्रोटीन, जीवनसत्त्वे यासारख्या सर्व आवश्यक घटकांचा आहारात समावेश करावा.

Web Title: pica disorder in children is related to eating mud or chalk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.