मुळव्याध अथवा पाईल्सच्या समस्येवर रामबाण ठरतील 'हे' घरगुती उपाय, नक्की ट्राय करुन पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 01:47 PM2022-09-22T13:47:51+5:302022-09-22T13:50:36+5:30

काही पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही बद्धकोष्ठता, मूळव्याध या समस्यांपासूनही बचाव करू शकता.

piles home remedies use this tips to get rid of piles | मुळव्याध अथवा पाईल्सच्या समस्येवर रामबाण ठरतील 'हे' घरगुती उपाय, नक्की ट्राय करुन पाहा

मुळव्याध अथवा पाईल्सच्या समस्येवर रामबाण ठरतील 'हे' घरगुती उपाय, नक्की ट्राय करुन पाहा

googlenewsNext

मुळव्याधच्या समस्येने बहुतांश लोक त्रस्त आहेत. मूळव्याध म्हणजे पाइल्स. मूळव्याध झाल्यास त्या व्यक्तीला मल किंवा गुदद्वारात सूज येण्याची समस्या उद्भवते. कधीकधी यात वेदना होतात आणि रक्त देखील बाहेर येते. बद्धकोष्ठतेमुळे गुदद्वारात सूज, वेदना वाढते. मूव्याधाचा माणसाला बराच त्रास होतो. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी अशा पदार्थांची यादी घेऊन आलो आहोत. ज्यांचा तुम्ही आहारात समावेश केल्यास तुम्हाला मूळव्याधीच्या त्रासासाठी डॉक्टरांकडे जायची गरज पडणार नाही.

सततच्या बद्धकोष्ठतेमुळे जळजळ, वेदना होऊ शकते. बद्धकोष्ठता कायम राहिल्यास माणसाला चालणेही कठीण होते. स्टूल जात असतानाही खूप वेदना होतात. अशा स्थितीत मूळव्याधांवर उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे. काही पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही बद्धकोष्ठता, मूळव्याध या समस्यांपासूनही बचाव करू शकता.

मुळव्याधीपासून आराम मिळवण्यासाठी मदत करतील हे पदार्थ

दूध : मुळव्याध सुरुवातीच्या टप्प्यात असेल तर दूध तुम्हाला मदत करू शकते. यासाठी फक्त एक ग्लास कोमट दुधात 1 चमचे गाईचे तूप मिसळून रात्री झोपताना प्या. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येवर आराम मिळतो आणि त्यामुळे मूळव्याधीची समस्याही कमी होते.

सफरचंद : सफरचंदांमध्ये आहारातील फायबर जास्त प्रमाणात असते. सफरचंदातील अघुलनशील तंतू पचनामध्ये तुटत नाहीत आणि मल मोकळा करण्यास, आतड्याची हालचाल सुधारण्यास मदत करतात. परिणामी मुळव्याध सारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी सफरचंदासारखी फायबरयुक्त फळे फायदेशीर ठरतात.

गाईचे तुप : पोट किंवा पचनाशी संबंधित समस्यांवर गायीचे तूप खूप गुणकारी आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा गाईचे तूप कोमट पाण्यात घ्या, असे केल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

नाशपाती : नाशपाती आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात भरपूर फायबर आणि इतर संयुगे असतात. ज्यामुळे मूळव्याधची लक्षणे कमी होतात. हे फळ त्वचेसाठीही आरोग्यदायी आहे. त्यात फ्रक्टोज देखील आहे, जे एक नैसर्गिक रेचक आहे.

काळा मनुका : शरीरात फायबरच्या कमतरतेमुळे मूळव्याध होतो. अशावेळी काळे मनुके खूप फायदेशीर ठरतात. काळ्या मनुकामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. मनुके खाताना ते भिजवून खाणे फार महत्वाचे असते. कारण ते कोरडे खाल्ल्यास गॅस्ट्रिकचा त्रास होऊ शकतो.

आवळा आणि मेथी : पोट आणि पचनाशी संबंधित समस्यांमध्ये आवळा खूप फायदेशीर मानला जातो. त्याचसोबत आवळा किंवा त्याचे चूर्ण बनवून खाल्यास बद्धकोष्ठतेवर फायदा होतो. पोटाशी संबंधित समस्यांवरही मेथीचे दाणे गुणकारी ठरतात. 1 चमचा मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा.

Web Title: piles home remedies use this tips to get rid of piles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.