नाकातला फोड करतोय हैराण? त्वरित करा 'हे' उपाय...काहीच क्षणांत मिळेल आराम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 02:22 PM2021-08-04T14:22:20+5:302021-08-04T14:28:23+5:30

फोडं किंवा पुटकुळी शरीरावर कुठेही येऊ शकतात आणि नाक देखील त्याला अपवाद नाही. नाकाच्या आत फोडं येणं केवळ त्रासदायकच नाही तर वेदनादायक देखील आहे. नाकात फोड अनेक कारणांमुळे उद्भवू शकतात.

pimple inside nose, causes, symptoms, remedies | नाकातला फोड करतोय हैराण? त्वरित करा 'हे' उपाय...काहीच क्षणांत मिळेल आराम

नाकातला फोड करतोय हैराण? त्वरित करा 'हे' उपाय...काहीच क्षणांत मिळेल आराम

googlenewsNext

फोडं किंवा पुटकुळी शरीरावर कुठेही येऊ शकतात आणि नाक देखील त्याला अपवाद नाही. नाकाच्या आत फोडं येणं केवळ त्रासदायकच नाही तर वेदनादायक देखील आहे. याचे सामान्य कारण म्हणजे त्वचेच्या छिद्रांमध्ये तेलकट किंवा मृत त्वचेचा साठा. नाकात फोड अनेक कारणांमुळे उद्भवू शकतात. काही प्रकरणांमध्ये संक्रमणाचं परिणाम असू शकते. तर काही वेळा तुमच्या सवयी याला कारणीभूत ठरतात.

जे लोक स्वच्छतेची काळजी घेत नाहीत त्यांना नाकात फोडं होण्याची शक्यता जास्त असते. नाकात बोटं घालणं, नाकात अस्वच्छ आणि वाढलेली नखं घालणं, नाकचे केस ओढणं किंवा नाकांचे केस काढण्यासाठी धारदार कात्री वापरणं यामुळे फोडं होण्याची शक्यता उद्भवते. तसंच अ‍ॅलर्जी, जीवाणूंचं संक्रमण, संप्रेरक असंतुलन, रासायनिक संपर्क, अस्वस्थ आहार किंवा लहान रक्तवाहिन्यांची सूज यामुळेदेखील नाकात फोडं होऊ शकतात. 

नाकात फोडं झाल्याची लक्षणं
नाकाला स्पर्श केल्यानंतर वेदना होणं, नाकाला सूज येणं, नाकाची त्वचा लालसर होणं, नाकाला खाज सुटणं आणि जळजळ  होणं ही नाकात फोडं झाल्याची लक्षणं आहेत. जेव्हा नाकात फोडं येतात तेव्हा नाक बंद झाल्यासारखं वाटतं. तसंच वास घेण्याच्या क्षमतेवरदेखील परिणाम होतो. डोकेदुखी, थकवा किंवा तीव्र तापाची लक्षणंदेखील काही बाबतीत संक्रमित फोडामुळे जाणवतात.

नाकात फोडं झाल्यावर काय उपाय करावेत?

बर्फाने शेका
नाकात फोडं झाल्याने जळजळ आणि वेदना होत असतील तर बर्फाने शेका. बर्फामुळे इन्फ्लेशन दूर होते व जळजळ आणि वेदना कमी होतात. बर्फामुळे त्वचेच्या छिंद्रात जमलेली घाण साफ होते. याच घाणीमुळे फोडं अथवा मुरुमं येतात.

सैंधव मीठ
सैंधव मीठाला एप्सम सॉल्टदेखील म्हटले जाते. नाकात फोड आल्यास सैंधव मीठाच्या पाण्याने दिवसातून २-३ वेळा धुवा. तसेच तुम्ही सैंधव मीठाच्या पाण्याने नाक शेकुही शकता.

टीट्री ऑईल
टीट्री असेंशियल ऑईल अँटी-बॅक्टेरियल असते. हे तेल लावल्यामुळे नाकातील सूज, जळजळ कमी होते व फोडं निघुन जातो.

 

Web Title: pimple inside nose, causes, symptoms, remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.