लठ्ठपणा कमी करायचाय? मग डाएट आणि जिमसोबत खा 'हे' ड्रायफ्रुट, वजन भराभर कमी होईल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 06:55 PM2022-04-11T18:55:17+5:302022-04-11T18:57:54+5:30
अरबट चरबट खाण्यापेक्षा मूठभर पिस्ता खाणं फायदेशीर ठरेल. कारण त्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, फायबर्स आणि अँटिऑक्सिडंट असतो. शिवाय पिस्ता नैसर्गिकरीत्या कोलेस्ट्रॉल फ्री असतो. जाणून घेऊया पिस्ता खाण्याचे फायदे
ड्रायफ्रुट्स खाणं हे आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं. शिवाय भूक लागली असेल त्यावेळी हा सुकामेवा खाल्ला तरी पोट भरल्यासारखं वाटतंय. ड्रायफ्रूट्समधील एक म्हणजे पिस्ता. अरबट चरबट खाण्यापेक्षा मूठभर पिस्ता खाणं फायदेशीर ठरेल. कारण त्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, फायबर्स आणि अँटिऑक्सिडंट असतो. शिवाय पिस्ता नैसर्गिकरीत्या कोलेस्ट्रॉल फ्री असतो. जाणून घेऊया पिस्ता खाण्याचे फायदे
डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर
पिस्ताच्या सेवनामुळे फ्री रॅडिकल्स डॅमेज होण्यास आळा बसतो. यामुळे डोळ्यांच्या विविध आजारांपासून संरक्षण होण्यास मदत होते.
लठ्ठपणा कमी होण्यास मदत
कॅलरीज न वाढवता पोट भरण्यासाठी पिस्ता हा उत्तम आणि हेल्दी पर्याय मानला जातो. पिस्तामुळे पोट भरलेलं राहते. परिणामी तुम्ही इतर अनहेल्दी पदार्थ खाणं आपोआप टाळता. यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.
इम्यूनिटी वाढते
पिस्तामध्ये असलेल्या व्हिटॅमिन बी 6 मुळे फक्त हिमोग्लोबिन वाढण्यास होण्यास मदत होते. शिवा. शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती देखील वाढते. त्यामुळे डॉक्टर देखील पिस्ता खाण्याचा सल्ला देतात.
त्वचेसाठी गुणकारी पिस्ता
चेहऱ्याचं सौंदर्य राखण्यासाठी पिस्ता उत्तम ठरतो. पिस्ता एखाद्या नैसर्गिक औषधापेक्षा कमी नाही. वाढत्या वयाची लक्षणं रोखण्यासाठी आणि सुरकुत्या दूर करण्यासाठी पिस्ता अत्यंत फायदेशीर आहे.
मेंदूच्या आरोग्यासाठी उत्तम
मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी पिस्ता खाणं फायदेशीर आहे. पिस्ता हा काजू, बदाम पेक्षाही जास्त पौष्टिक असतो. त्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. यासाठी तज्ज्ञ लहान मुलांना पिस्ता खाण्याचा सल्ला देतात.