डिप्रेशनचं कारण बनतं तुमचं फेवरेट जंक फूड - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 02:10 PM2019-05-20T14:10:15+5:302019-05-20T14:12:08+5:30
अनेकदा कामाचा ताण आणि धकाधकीची जीवनशैली यांमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्या कधीकधी शारीरिक असतात किंवा मानसिक असतात.
अनेकदा कामाचा ताण आणि धकाधकीची जीवनशैली यांमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्या कधीकधी शारीरिक असतात किंवा मानसिक असतात. अशातच आपला मूड ठिक करण्यासाठी लोक अनेक पर्यायांचा वापर करतात. काही लोक टीव्ही पाहतात तर काही लोक सोशल मीडियाचा आधार घेतात. यातीलच काही लोक आपला मूड ठिक करण्यासाठी आपल्या आवडत्या पदार्थांकडे धावतात. तुमचा मूड ठिक करणाऱ्या पदार्थांमध्ये अनेकदा जंक फूडचाच समावेश असतो. यामध्ये समावेश होणारे पिझ्झा, बर्गर यांसारखे पदार्थ तुमचं डिप्रेशन कमी करण्याऐवजी आणखी वाढवतात. असं आम्ही नाही तर एका रिसर्चमधून सिद्ध झालं आहे.
खरं तर बदलत्या जीवनशैलीमुळे जंक फूड मोठ्यांसोबतच लहानांच्या जीवनाचाही अविभाज्य भाग झाला आहे. या सवयीमुळे अनेक मुलंही हेल्दी फूडऐवजी जंक फूड खाणंच पसंत करतात. जंक फूड खाल्याने मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास योग्य पद्धतीने होत नाही. जंक फूडचे जास्त सेवन केल्यामुळे अनेक मुलं सध्या लठ्ठपणासारख्या आजारांचा सामना करत असीन जंक फूडमुळे अनेक घातक आजार होण्याचाही धोका असतो. सध्या तर मोठ्यांसोबतच लहान मुलांमध्येही डिप्रेशनची समस्या आढळून येते.
रिसर्चमध्ये सांगितल्यानुसार, पिझ्झा, बर्गर यांसारखे पदार्थ डिप्रेशन वाढविण्याचं काम करतात. अनेकदा सॅच्युरेटेड फॅट्स रक्तामार्फत मेंदूपर्यंत पोहोचतात. जर ते मेंदूच्या हायपोथॅलमसवर परिणाम करत असतील तर तुमच्यामध्ये डिप्रेशनची लक्षणं दिसू शकतात. दरम्यान, हायपोथॅलमस मेंदूचा तो हिस्सा आहे, जो भावनांवर नियंत्रण ठेवतो.
जंक फूड आणि डिप्रेशन यांमधील संबंध दर्शविणारा रिसर्च यूनिवर्सिटी ऑफ ग्लासगो यांच्यामार्फत करण्यात आला होता. यातील खास गोष्ट म्हणजे, रिसर्चदरम्यान डिप्रेशन आणि लठ्ठपणामधील संबंध दिसून आले आहेत. लठ्ठपणाच्या शिकार असणाऱ्या लोकांवर अॅन्टी डिप्रेसेन्टचा परिणाम साधारण लोकांच्या तुलनेत कमी असतो. अशातच हे स्पष्ट आहे की, हाय फॅट्स डाएट डिप्रेशन वाढवण्याचं काम करतं. या रिसर्चनंतर आता अशी आशा आहे की, डिप्रेशनवरील औषधं तयार करताना काही नवीन गोष्टी लक्षात घेऊन त्यानुसारच औषधं तयार करण्यात येतील.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून त्या एका रिसर्चमधून सिद्ध झालेल्या आहेत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.