oxygen concentrator : कोरोनाकाळात घरी वापरण्यासठी ऑक्सिजन कंसंट्रेटर घेत असाल तर 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 06:13 PM2021-05-05T18:13:16+5:302021-05-05T18:28:53+5:30

oxygen concentrator : ऑक्सिजन होम थेरपीसाठी सिलेंडर किंवा कंसंट्रेटर खरेदी करण्यापूर्वी, रुग्णांना किती लिटर ऑक्सिजनची आवश्यकता आहे याची खात्री करुन घ्या.

Planning to buy an oxygen concentrator for home isolated covid patients here what you need to know | oxygen concentrator : कोरोनाकाळात घरी वापरण्यासठी ऑक्सिजन कंसंट्रेटर घेत असाल तर 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात 

oxygen concentrator : कोरोनाकाळात घरी वापरण्यासठी ऑक्सिजन कंसंट्रेटर घेत असाल तर 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात 

Next

 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोविड रूग्णालयात भरती असलेल्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे, जिथे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दररोज शेकडो लोक मरत आहेत. दरम्यान सर्व डॉक्टरांनी कोरोना संक्रमित रूग्णांना घरी ऑक्सिजन पातळी व्यवस्थित ठेवण्याचा सल्लाही देला आहे. परंतु त्याचवेळी सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही देत ​​आहेत. अशा परिस्थितीत, आपण देखील आपल्या घरात ठेवण्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर किंवा ऑक्सिजन कंसंट्रेटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील.

काय आहे ऑक्सिजन  कंसंट्रेटर

हे एक वैद्यकीय उपकरण आहे जे एकाच वेळी आसपासच्या हवेतील ऑक्सिजनचे निरीक्षण करते.  पर्यावरणाच्या हवेमध्ये 78 टक्के नायट्रोजन आणि 21 टक्के ऑक्सिजन वायू असतो आणि बाकीच्या वायूंचे प्रमाण केवळ 1 टक्का आहे. ऑक्सिजन कंसंट्रेटरने ही हवा आत घेतली आणि नंतर ते फिल्टर होते आणि नायट्रोजन परत हवेत सोडले जाते. या प्रक्रियेद्वारे, कंसंट्रेटरमध्ये वापरल्या जाणार्‍या ऑक्सिजनचा उपयोग करून रुग्णाच्या ऑक्सिजनची कमतरता पूर्ण केली जाते. 

अशी घ्या काळजी

ऑक्सिजन होम थेरपीसाठी सिलेंडर किंवा कंसंट्रेटर खरेदी करण्यापूर्वी, रुग्णांना किती लिटर ऑक्सिजनची आवश्यकता आहे याची खात्री करुन घ्या. कंसंट्रेटरची क्षमता आपल्या गरजेपेक्षा जास्त असावी. उदाहरणार्थ, जर आपल्याला प्रति मिनिट 3.5 लिटर ऑक्सिजन हवा असेल तर आपल्याला 5 लिटरचा कंसंट्रेटर घ्यावा लागेल. शुद्धता सूचक (ओपीआय) सह ऑक्सिजन कंसंट्रेटर खरेदी करा.

तज्ञांच्या मते, ९० टक्क्यांहून अधिक शुद्धता असणारा ५ लिटरचा कंसंट्रेटर हा 3 लोकांच्या लहान कुटुंबासाठी योग्य पर्याय आहे. दुसरीकडे, जर आपल्याकडे आपल्या कुटुंबात अधिक सदस्य असतील तर १० लिटरचाही  घेऊ शकता. परंतु वैद्यकीय ग्रेड असलेलं ऑक्सिजन कंसंट्रेटर चांगले ठरते. 

सध्याच्या काळात ऑक्सिजनची मागणी वाढल्यामुळे कंसंट्रेटरच्या किंमतींमध्ये अचानक वाढ झाली आहे. सध्या ऑक्सिजन सिलिंडरची किंमत 8 ते 20 हजार रुपयांदरम्यान आहे.  तर ऑक्सिजन कंसंट्रेटर्सची किंमत 40 हजार रुपयांवरून 90 हजार रुपयांवर गेली आहे. परंतु जो कोणी एक कंसंट्रेटर विकत घेतो त्याला भविष्यात कमी त्रास होतो. याशिवाय 5 वर्षांपर्यंत विजेशिवाय इतर कशाचीही गरज नसते. Corona Precautions : कोरोनाशी लढण्यासाठी आयुष मंत्रालयानं दिले घरगुती उपाय; इम्यूनिटी वाढवण्याचा सोपा फंडा

बाजारपेठेत दोन प्रकारचे कंसंट्रेटर आहेत, स्टेशनरी आणि पोर्टेबल. दोन्ही प्रकारच्या उपकरणांना ऑक्सिजन तयार करण्यासाठी पुन्हा भरण्याची आवश्यकता नसते. तथापि,  स्टेशनरी कंसंट्रेटर  थेट विजेवर चालतात, तर पोर्टेबल बॅटरीवर देखील चालू शकतात. पोर्टेबल महाग असतात जे आपल्यासह कोठेही घेऊन जाता येऊ शकते. कोविड दरम्यान लॉकडाऊन दरम्यान, आपण पोर्टेबलऐवजी स्टेशनरी  विकत घ्यायला हवे. त्याच वेळी, आपण प्रवास करू इच्छित असल्यास पोर्टेबल कंसंट्रेटर खरेदी करा. मास्क लावल्याने गुदमरल्यासारखं होतं का?... मग या साध्या-सोप्या टिप्स वाचाच!

Web Title: Planning to buy an oxygen concentrator for home isolated covid patients here what you need to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.