डासांमुळे वैतागले असाल तर लगेच घरी लावा हे झाड, आजूबाजूलाही फिरकणार नाही डास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 01:15 PM2023-12-14T13:15:00+5:302023-12-14T13:16:42+5:30

एका गार्डन एक्‍सपर्टने दावा केला की, एक असं झाड आहे जे तुम्ही घराच्या गार्डन किंवा कुंडीत लावलं तर डास येणारच नाहीत.

Plant which keeps Mosquitos away and also has anti bacterial benefits lemon balm plants | डासांमुळे वैतागले असाल तर लगेच घरी लावा हे झाड, आजूबाजूलाही फिरकणार नाही डास

डासांमुळे वैतागले असाल तर लगेच घरी लावा हे झाड, आजूबाजूलाही फिरकणार नाही डास

Secret Of Keeping Mosquitos Away : हिवाळ्यात डासांची समस्या खूप वाढते. रात्रभर ते कानाजवळ आवाज करून झोप खराब करतात. इतकंच नाहीतर डेंग्यू, मलेरियासारखे गंभीर आजारही होतात. डास पळवून लावण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. पण तरीही डास काही कमी होत नाहीत. अशात एका गार्डन एक्‍सपर्टने दावा केला की, एक असं झाड आहे जे तुम्ही घराच्या गार्डन किंवा कुंडीत लावलं तर डास येणारच नाहीत.

मेलिसा नावाची गार्डन एक्सपर्ट नेहमीच इन्स्टावर आपल्या गार्डन टिप्स देत असतात. त्यानी सांगितलं की, हे रोप इतकं खास आहे की, तुम्ही याला मॉस्क्विटो रेपलेंट म्हणूनही वापरू शकता. हे प्रत्येक ऋतुमध्ये कामात येतं आणि डासांसोबतच खतरनाक कीटकांनाही घरापासून दूर ठेवतं. रक्त पिणारे कोणतेही कीटक या झाडामुळे पळून जातील.

कोणतं झाड?

मेलिसा यानी सांगितलं की, या झाडाचं नाव लेमन बाम (Lemon balm) आहे. मेलिसा म्हणाल्या की, या झाडाची पाने आपल्या शरीरावर घासली आणि सांगितलं की, हा एक बेस्ट उपाय आहे. जो या कीटकांपासून आपला बचाव करेल. 

मेलिसा यांच्यानुसार, जेव्हाही डास त्यांच्याजवळ येतात तेव्हा त्या या पानांचा रस शरीरावर लावतात. लेमन बामला लिंबू बाम नावानेही ओळखलं जातं. हे झाड पदीना परिवारातील एक आहे. अमेरिका, ब्रिटनसहीत जगभरातील जवळपास सगळ्याच देशांमध्ये याची प्रजाती मिळते. लेमन बामला इतर नावेही आहेत ज्यात बी बाम, क्योर-ऑल, ड्रॉप्सी प्लांट, हनी प्लांट, मेलिसा, मेलिसा फोलियम, मेलिसा ऑफिसिनॅलिस, स्वीट बाम आणि स्वीट मेरी असंही म्हणतात. भारतात याला लिंबू बाम किंवा लेमन बाम असंच म्हटलं जातं.

कसा येतो सुगंध

लेमन बाम मिंट फॅमिलीतील एक मेंबर प्लांट आहे. याची पाने घासल्यावर लिंबासारखा सुगंध येतो. यात बॅक्टेरिअल इन्फेक्शन नष्ट करण्याची ताकद असते. याच्या पानांपासून हर्बल टी सुद्धा बनवली जाते. ज्यामुळे स्ट्रेस कमी होते, चांगली झोप लागणे, भूक वाढणे, अपचन, गॅस, सूज आणि पोटाच्याही समस्या दूर होतात. 

Web Title: Plant which keeps Mosquitos away and also has anti bacterial benefits lemon balm plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.