प्लास्टिकच्या डब्यात आणि अॅल्युमिनिअम फाइल पेपरमध्ये पदार्थ का पॅक करू नये?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 10:15 AM2019-02-15T10:15:54+5:302019-02-15T10:44:04+5:30
मुलांसाठी आकर्षक रंगीबेरंगी प्लास्टिकटे डबे घेतले जातात. तर ऑफिससाठीही अशाच डब्यांचा वापर केला जातो.
(Image Credit : Smart Parenting)
ऑफिसचा जेवणाचा डबा, मुलांचा शाळेच्या डब्यांचे वेगवेगळे प्रकार बाजारात सहज उपलब्ध होतात. मुलांसाठी आकर्षक रंगीबेरंगी प्लास्टिकटे डबे घेतले जातात. तर ऑफिससाठीही अशाच डब्यांचा वापर केला जातो. मात्र खाण्याचे पदार्थ अॅल्युमिनियम फॉयल, प्लास्टिक किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये पॅक करणे हे एकरप्रकारे बुहतेक लोकांची सवयच झाली आहे. पण तुम्ही हे ध्यानात घेतलंय का की, तुम्हाला कितीदा गरम पदार्थ प्लास्टिकच्या प्लेट्समध्ये दिली जाते? अॅल्युमिनिअम फॉयलचा तुम्ही किती वापर करू लागले आहात?
प्रसिद्ध न्यूट्रिशन आणि एक्सरसाइझ एक्सपर्ट रूतुजा दिवेकर यांनी त्यांच्या फेसबुक लाइव्हमधून याबाबत एक सूचना केली आहे. त्यांनी सांगितले की, प्लास्टिक डबे किंवा अॅल्युमिनिअम फॉयलऐवजी जेवण पॅक करण्यासाठी स्टीलच्या डब्याचा किंवा मऊ कापडाचा वापर करावा. तसेच पाण्यासाठीही रूतुजा यांनी प्लास्टिकऐवजी स्टील, माती किंवा तांब्याच्या बॉटलचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.
रूतुजा सांगतात की, आपला हाच प्रयत्न असतो की, आपण जे पदार्थ तयार करू त्यात भरपूर पोषक तत्त्व असावेत. त्यामुळे अशा कोणत्या वस्तूंमध्ये पॅक करावेत, ज्याने आरोग्याचं नुकसान होईल.
प्लास्टिक आणि अॅल्युमिनिअमच्या डब्यामध्ये पदार्थ ठेवल्याने या डब्याचे केमिकल किंवा तत्त्व पदार्थांमध्ये उतरतात. खासकरून तेव्हा जेव्हा डब्यातील पदार्थ गरम असतात. असे पदार्थ खाल्ल्याने हळूहळू याचे दुष्परिणाम दिसायला लागतात.
प्लास्टिकमध्ये जीने एस्ट्रोजन नावाचं हानिकारक रसायन निघतं. ज्याच्यामुळे शरीरात हार्मोनल असंतुलन होतं. याचा खासकरून लहान मुलांच्या विकासावर फार वाइट परिणाम होतो. रूतुजा सांगते की, फूड पॅकेजिंगसाठी प्लास्टिकचा वापर हा आरोग्यास हानिकारक आहे. पण केवळ स्वस्त आहे म्हणून या प्लास्टिकच्या डब्याचा वापर केला जातो.