खेळा.. अगदी काहीही आणि व्हा चिंतामुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 03:33 PM2018-01-13T15:33:27+5:302018-01-13T15:35:08+5:30

रोजचा खेळ तुमचं आयुष्य करील अधिक समृद्ध आणि आनंदी..

 Play.. Anything else and be cheerful ! | खेळा.. अगदी काहीही आणि व्हा चिंतामुक्त!

खेळा.. अगदी काहीही आणि व्हा चिंतामुक्त!

ठळक मुद्देखेळामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढते, उत्तम व्यायाम घडतो.नव्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठीची आपली क्षमताही खूपच वाढते..पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेळामुळे आपल्या शरीर-मनावरचा ताण खूपच कमी होतो आणि आपण चिंतामुक्त होतो.

- मयूर पठाडे

तुम्हाला कोणता खेळ आवडतो? तुम्ही कोणता खेळ खेळता? आणि खेळ खेळायचा तरी कशासाठी?.. खेळाचे फायदे अर्थातच आपल्या सर्वांना माहीत आहेत. खेळामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं, फिटनेस वाढतो. भविष्यातील आजारपणं टाळता येतात, आपण उत्साही राहतो. कार्यक्षमता वाढते.. स्टॅमिना, ताकद वाढते.. अनेक गोष्टी..
खेळामुळे आपूसकच आपली प्रतिकार शक्ती वाढते, त्यामुळे उत्तम व्यायाम घडतो आणि नव्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठीची आपली क्षमताही खूपच वाढते..
या साºयाच गोष्टी बहुदा आपल्याला माहीत असतात, आहेत, पण खेळाची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेळामुळे आपल्या शरीर-मनावरचा ताण खूपच कमी होतो आणि आपण चिंतामुक्त होतो.
यासंदर्भातील जागतिक संशोधनंही प्रसिद्ध आहेत. तुम्ही लहान असा कि मोठे.. किंबहुना तुमचं वय कितीही असलं, वयानं तुम्ही कितीही ज्येष्ठ असलात, तर कोणताही खेळ तुम्ही खेळत असाल, तर तुमच्या आरोग्यासाठी तर ते फायदेशीर आहेच, पण त्यापेक्षाही अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारच्या ताण-तणावापासून तुम्ही वाचता. अधिक प्रसन्न राहता.
संशोधकांनीही ही गोष्ट सिद्ध केली आहे.
त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेण्टचं उत्तम उदाहरण म्हणजे कुठलाही खेळ खेळणं. तुम्ही खेळत नसाल, तर आजच खेळ खेळायला सुरुवात करा आणि मग पाहा तुमच्यात काय फरक पडतो ते..

Web Title:  Play.. Anything else and be cheerful !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.